ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात कैरीचे पन्हं हे शरीरासाठी खूप चांगले असते. कैरीचे पन्ह बनवण्याची सोपी रेसिपी घरी नक्की ट्राय करा.
सर्वप्रथम कैरी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून कुकरची एक शिट्टी काढा.
उकडलेली कैरी प्लेटमध्ये कैरी काढून घ्या आणि त्याचे पाणी गाळून बाजूला ठेवा.
कैरी थंड झाल्यावर कैरीची साल काढा आणि हाताने त्याचा गर काढा.
यानंतर मिक्सरच्या भांड्यात कैरीचा गर घाला. त्यात भाजलेले जिरे पूड, काळे मीठ, पांढरे मीठ, साखर आणि पुदिन्याची पाने घाला.
या मिश्रणात 4 ते 5 बर्फाचे तुकडे घाला आणि ज्या पाण्यात कैऱ्या उकळल्या ते पाणी घालून बारीक वाटून घ्या.
गरजेनुसार थंड पाणी घालून ढवळा. यानंतर हे पन्ह चांगल हलवून घ्या. त्यात थोड काळे मीठ शिंपडा.