ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीयांमध्ये लग्नाचे खूप जास्त महत्त्व आहे.
लग्नात अनेक विधी- परंपरा केले जातात. नवीन जोडप्याच्या आयुष्यासाठी हे सर्व विधी केले जातात.
हिंदू धर्मात लग्नात नवीन नवरीच्या पायात चांदीची जोडवी घालण्याची पद्धत आहे.
हिंदू धर्मात नवीन नवरीच्या अंगठ्याच्या बाजूच्या बोटात जोडवी घातली जाते.
जोडवी घालण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे आहेत.
रावणाने सीतेचे अपहरण केले होते. तेव्हा त्यांनी प्रभू श्रीरामांसाठी खूण म्हणून जोडवी सोडली होती, असे मानले जाते. त्यामुळे नवरा- बायकोच्या नात्यात विश्वास असावा, म्हणून जोडवी घातली जाते.
यामागील वैज्ञानिक कारण म्हणजे अंगठ्याजवळच्या बोटांच्या नसा महिलेच्या हृदयाशी आणि गर्भाशयाशी जोडलेल्या असतात.
यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचे साम टीव्ही समर्थन करत नाही.