Diabetes Tips : मधुमेहींनो, रक्तातील साखर सतत वाढते? रात्री झोपण्यापूर्वी करा हे काम

How To Control Blood Sugar : मधुमेह हा असा आजार आहे जो फक्त नियंत्रणात आणू शकतो. हा आजार इन्सुलिन नावाच्या हार्मोनच्या असंतुलनामुळे होतो. इंसुलिन हा एक संप्रेरक आहे जो आपल्या शरीराच्या पोषणासाठी अन्नातून ग्लुकोज पेशींमध्ये पोहचवण्याचे काम करतो.
Diabetes Tips
Diabetes TipsSaam Tv

Reason High Fasting Sugar :

मधुमेह हा असा आजार आहे जो फक्त नियंत्रणात आणू शकतो. हा आजार इन्सुलिन नावाच्या हार्मोनच्या असंतुलनामुळे होतो. इंसुलिन हा एक संप्रेरक आहे जो आपल्या शरीराच्या पोषणासाठी अन्नातून ग्लुकोज पेशींमध्ये पोहचवण्याचे काम करतो.

मिळालेल्या माहितीनुसार जगभरात मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शरीरात वाढणाऱ्या साखरेमुळे आरोग्यावर परिणाम होतो. हा आजार अनियमित जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तणाव (Stress) आणि आनुवांशिकता यामुळे होऊ शकतो.

रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते आणि मग आपल्याला मधुमेहाच्या दोन प्रकारांपैकी एक समस्या उद्भवते. जाणून घेऊया आरोग्याची (Health) कशी काळजी घ्यायची

1. टाइप १

टाइप १ मधुमेहामध्ये इंसुलिनची पूर्ण उपस्थिती नसते. त्यामुळे शरीराला दररोज इन्सुलिनची आवश्यकता भासते.

Diabetes Tips
World Liver Day 2024: लिव्हरमध्ये साचलेली घाण मुळासकट निघेल, आहारात करा या ५ पदार्थांचा समावेश

2. टाइप २

टाइप २ मधुमेहामध्ये आपले शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करु शकत नाही. हा मधुमेह सहसा वाढत्या वयात होतो. या वयात शरीरातील इन्सुलिनचे उत्पादन कमी होऊ लागते.

3. शरीरातील साखर का वाढते?

जास्त दिवस रोजचे जेवण टाळल्यामुळे शरीरात साखर जास्त होते. याशिवाय रात्री जेवण न केल्याने किंवा बराच वेळ उपाशी राहिल्याने शरीरातील साखर वाढते.

Diabetes Tips
Curd Rice Recipe: उन्हाळ्यात पोटाला द्या गारवा, झटपट बनवा साउथ इंडियन स्टाइल दही बुत्ती

4. शुगर हाय फास्टिंग टाळण्याचे उपाय

  • रात्री नेहमी हलका आहार घ्या आणि गोड खाणे टाळा.

  • नियमितपणे व्यायाम करा त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहिल.

  • रात्री जेवल्यानंतर अर्धा तास किंवा पंधरा मिनिटे फिरायला जा.

  • रात्री झोपण्यापूर्वी ध्यान आणि योगासने करा. यामुळे तणाव कमी होतो तसेच साखरेची पातळी राखण्यास मदत होते.

  • दिवसभर आठ ते दहा ग्लास पाणी प्या. झोपण्यापूर्वी पाणी अवश्य प्या.

  • मधुमेहाच्या रुग्णांना दात दुखी आणि हिरड्यांचा त्रास होण्याची भीती असते. म्हणून नेहमी सकाळी आणि रात्री नियमितपणे दात स्वच्छ करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com