Happy Hormones वाढवायचे आहे? आहारात करा या पदार्थांचा समावेश

How To Increase Happy Hormone In body : आजकाल वाढता ताण आणि कामाच्या दबावामुळे लोक शारीरिक आणि मानसिक आजारांना बळी पडत आहे. हल्लीच्या ताणतणावांनी भरलेल्या आयुष्यात आपला आनंद हरवला आहे.
Happy Hormones
Happy HormonesSaam Tv

Foods For Happy Hormones :

आजकाल वाढता ताण आणि कामाच्या दबावामुळे लोक शारीरिक आणि मानसिक आजारांना बळी पडत आहे. हल्लीच्या ताणतणावांनी भरलेल्या आयुष्यात आपला आनंद हरवला आहे.

वाढत्या स्ट्रेसमुळे (stress) आपण आरोग्याच्या अनेक समस्यांना बळी पडतो. त्यामुळे आपल्या हार्मोन्समध्ये देखील बदल होतात. ज्यामुळे आपली चिडचिड होते. परंतु, शरीरात आनंदी हार्मोन्स हवे असतील तर आहारात (food) काही पदार्थांचा समावेश करायला हवा.

1. चेरी टोमॅटो

चेरी टोमॅटोमध्ये फायटोन्युट्रिएंट लाइकोपीनने असते. ज्यामुळे नैराश्य (Depression) कमी करण्यास मदत करतात. तसेच शरीरात हॅप्पी हार्मोन्स वाढवण्याचे काम करते.

Happy Hormones
Curd Rice Recipe: उन्हाळ्यात पोटाला द्या गारवा, झटपट बनवा साउथ इंडियन स्टाइल दही बुत्ती

2. डार्क चॉकलेट

अनेकांना डार्क चॉकलेट खायला आवडते. हे औषधांपेक्षा कमी नाही. हे खाल्ल्याने शरीरातील वेदना कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते.

3. ब्लू बेरी

ब्लू बेरीमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीरात हॅपी हार्मोन्स निर्माण होतात. याचे सेवन केल्याने नैराश्य निर्माण होण्याचा धोका कमी होतो.

4. केळी

सेरोटोनिन समृद्ध असलेली केळी आपल्या मेंदूमध्ये आनंदाची भावना विकसित करण्यास मदत करते. यासाठी दैनंदिन आहारात याचा समावेश करा.

Happy Hormones
Beetroot Juice Benefits : उन्हाळ्यात बीटाचा रस पिण्याचे फायदे

5. एवोकॅडो

एवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन बी६ समृद्ध, आपल्या मेंदूमध्ये सेरोटिनिनच्या उत्पादनास प्रोत्साहन देते. जे आपल्या मेंदूला आनंदी राहण्यास मदत करते. याशिवाय आहारात हिरव्या पालेभाज्या, ड्रायफ्रुट्स, नट-बिया आणि ओट्स याचा समावेश करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com