

सध्या मार्च महिना सुरु झाला आहे. या दिवसांमध्ये थंडीचं प्रमाण खूप कमी होतं. कधीकधी १० वाजताच कडाक्याचं ऊन पडतं. त्यामुळे अनेकांना घाम येण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. तर दुसरीकडे काहींना ताप नसताना, आजारपण नसताना सारखी थंडी लागते आणि अंग दिवसभर थंड राहतं. ही समस्या वाटते खूप सामान्य पण मुळात ती तशी नसते. त्यामुळे ही समस्या दुर्लक्षित करणं आत्ताच सोडा.
थायरॉइडचा त्रास
जर हिवाळा ऋतू असल्यामुळे थंडी वाजत असेल तर ती सामान्य असते. पण थायरॉइडचा त्रास असलेल्या लोकांना अनेकदा सतत थंडी वाजत असल्यासारखं वाटत असतं. कारण थायरॉइड ग्रंथी शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचं काम करते. शरीरातील थायरॉइड हार्मोन्सचे संतुलन बिघडल्याने शरीरात उष्णता कमी प्रमाणात तयार होते आणि त्यामुळे व्यक्तीला नेहमी थंडी जाणवू शकते.
डिहायड्रेशनचा त्रास
शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन झालं असेल तर शरीराचं तापमान व्यवस्थित नियंत्रणात राहात नाही. शरीरात पुरेसं पाणी नसल्याने रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि शरीरातील उष्णतेचं योग्य वितरण होत नाही. यामुळे सतत थंडी वाजू शकते.
रक्ताभिसरणाच्या समस्या
रक्ताभिसरण व्यवस्थित नसेल तर शरीर थंड पडल्यासारखं वाटू शकतं. हात-पाय सतत थंड राहणं हे खराब रक्ताभिसरणाचे लक्षण असू शकतं. काही वेळा रेनॉड्स डिसीज किंवा हृदयाशी संबंधित आजारांमुळेही रक्तप्रवाह कमी होतो आणि त्यामुळे शरीराला थंडी जास्त जाणवते.
झोपेचा अभाव
पुरेशी झोप मिळाली नाही तर शरीरावर परिणाम होतो. झोपेची कमतरता असल्यावर शरीराचा मेटाबॉलिझम मंदावतो आणि शरीराला उष्णता टिकवून ठेवणं कठीण होतं. त्यामुळे सतत थंडी वाजल्यासारखं वाटू शकतं.
अॅनिमियाचा त्रास
अॅनिमिया म्हणजेच शरीरात लाल रक्तपेशींची कमतरता असणं हे सुद्धा सतत थंडी जाणवण्यामागचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं. रक्तातले हिमोग्लोबिन कमी असेल तर शरीरातले ऑक्सिजनचे वहन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे हात आणि पाय थंड पडतात.
टीप
ही माहिती आरोग्यविषयक संकेतस्थळ हेल्थलाइनवर उपलब्ध माहितीनुसार देण्यात आली आहे. जर तुम्हाला सतत थंडी वाजत असल्याचा त्रास होत असेल, तर योग्य निदान आणि उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.