Sakshi Sunil Jadhav
हेअर वॉश करण्यापूर्वी केस हलक्या हाताने कंगव्याने विंचरा. त्यामुळे ओले केस धुताना तुटण्याची शक्यता कमी होते.
जास्त गरम पाणी केसांचा नैसर्गिक ओलावा काढून टाकतं, तर थंड पाण्याने घाण व्यवस्थित निघत नाही. त्यामुळे कोमट पाण्याचा वापर करणं योग्य आहे.
जर तुमचा स्कॅल्प ऑयली असेल तर डीप-क्लिनिंग शॅम्पू वापरा. स्कॅल्प ड्राय असेल तर हायड्रेटिंग शॅम्पू निवडा. शक्यतो सल्फेट-फ्री शॅम्पू वापरा.
शॅम्पू आधी हातात घेऊन त्यात थोडं पाणी मिसळून हलका फेस तयार करा आणि मग स्कॅल्पवर लावा. यामुळे शॅम्पू एकसमान पसरतो.
बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने स्कॅल्पवर मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारेल आणि केसांच्या वाढीस मदत होईल.
शॅम्पू डोक्याच्या स्कॅल्पवर लावा. पाण्याबरोबर फेस केसांच्या लांबीवर आपोआप पसरतो.
कंडिशनर फक्त केसांच्या लांबीवर आणि टोकांवर लावा. स्कॅल्पवर कंडिशनर लावल्याने चिकटपणा आणि केस गळण्याची शक्यता वाढू शकते.
ओले केस जोरात घासू नका. सॉफ्ट टॉवेलने हलक्या हाताने दाबून केस सुकवा.
दररोज केस धुतल्याने त्यातलं नैसर्गिक तेल निघून जातं. आठवड्यातून 2 ते 3 वेळा केस धुणं योग्य आहे.