High Blood Pressure: तंदुरुस्त असूनही BP का वाढतो? डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण, वाचा महत्वाचा सल्ला

Fitness Tips: फिट असूनही काही व्यायाम पद्धतींमुळे रक्तदाब अचानक वाढू शकतो. तज्ज्ञांच्या मते जड वजन उचलणे, श्वास रोखणे किंवा HIIT सारखे व्यायाम हृदयावर ताण आणू शकतात.
High Blood Pressure
High Blood Pressure GOOLE
Published On

सध्याच्या जीवनशैलीत खूप बदल होताना पाहायला मिळत आहेत. अनेकांच्या रोजच्या सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसतात. विशेषत: तिशी ओलांडलेल्या व्यक्तींना हे बदल जाणवतात. उत्तम लाइफस्टाईलसाठी लोक दिवसरात्र मेहनत करतात. पण त्यामध्ये त्यांच्या शरीराकडे दुर्लक्ष होतंय हे बऱ्यादचा कोणाला कळत नाही. लोकांना होणारे त्रास हे कुटुंबासाठी किंवा त्यांच्या स्वप्नांसाठी दुर्लक्षित करतात. पण काही गंभीर आजारांचे हे संकेत असू शकतात. ज्यांना तज्ज्ञ ही सायलेंट किलर असं म्हणतात.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, हाय ब्लड प्रेशर हा तुमच्या जीवाला मोठा धोकाच असतो. एकदा हा आजार झाला की, सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. त्यासाठी गोळ्या औषधांसोबत काही घरगुती उपाय करायचे असतात. यासाठी एकही पैसा खर्च करण्याची गरज नसते. तो उपाय म्हणजे काही व्यायाम. याने तुमच्या धमन्यांना, ह्रदयाला पुरेपुर फायदा होतो आणि हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

High Blood Pressure
Ukad Shenga Recipe: होळीला पुरणपोळीच कशाला? बनवा ओल्या नारळाच्या उकडशेंगा, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

World Health Organization च्या माहितीनुसार जगभरात एक अब्जाहून जास्त प्रौढ व्यक्ती उच्च रक्तदाबाच्या समस्येला सामोरे जात आहेत. त्यामुळे मृत्यूला कवटाळण्यापेक्षा काही सोपे व्यायाम करुन तुम्ही BP नियंत्रणात आणू शकता. पण बऱ्याचदा त्यातल्या चुका टाळणं खूप फायद्याचं ठरु शकतं.

फिटनेस तज्ज्ञ Mukul Nagpaul यांच्या मते, काही प्रकारचे व्यायाम करताना हृदयाची गती अचानक वाढते किंवा लोक श्वास थांबवून ताकद लावतात. अशा वेळी रक्तदाब झपाट्याने वाढू शकतो. काही रेसिस्टन्स आणि आयसोमेट्रिक प्रकारचे व्यायाम करताना तात्पुरता रक्तदाब मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.

उदाहरणार्थ, जड वजन उचलताना अनेकजण नकळत श्वास रोखतात, ज्याला वल्साल्वा मॅन्युव्हर म्हटलं जाते. त्याने रक्तप्रवाह काही क्षणांसाठी कमी होतो आणि रक्तदाब अचानक वाढतो. त्याऐवजी कमी वजन करणं गरजेचं आहे. प्लँक किंवा वॉल सिटसारख्या आयसोमेट्रिक व्यायामांमध्ये शरीर एकाच स्थितीत बराच वेळ ठेवले जातं. यामुळे स्नायूंवर सतत ताण राहतो आणि हृदयाला जास्त जोराने रक्त पंप करावे लागते.

हाय-इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग म्हणजेच HIIT मध्ये कमी वेळेत अतिशय तीव्र व्यायामाचे सत्र असते. अशा प्रकारच्या अचानक वेदना दायक व्यायामामुळे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये ह्रदयाशी संबंधित धोके वाढू शकतात. त्याचप्रमाणे स्प्रिंटिंग करताना शरीरावर अचानक मोठा ताण येतो आणि रक्तदाब झपाट्याने वाढू शकतो. बर्पीज किंवा जंपिंग जॅक्ससारख्या हाय-इम्पॅक्ट हालचालींमध्ये शरीराला सतत दिशा बदलावी लागते, त्याने हार्ट आणि धमन्यांवर ताण पडतो.

व्यायाम करताना चक्कर, मळमळ, अचानक श्वास लागणं, छातीत वेदना होणे किंवा हृदयाचे ठोके अनियमित वाटणे अशी लक्षणे जाणवली तर लगेच थांबा आवश्यक आहे. ही लक्षणे हृदयावर जास्त ताण आल्याची चिन्हे असू शकतात.

टीप: नवीन व्यायाम सुरू करण्यापूर्वी किंवा व्यायाम पद्धतीत बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.

High Blood Pressure
Summer Diet Alert: उन्हाळ्यात कोणती फळं खाणं टाळावीत?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com