Blood Pressure: BP च्या गोळ्या घेताना ही चूक करत नाहीत ना? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

BP Medicine Timing Advice: बदललेल्या जीवनशैलीमुळे वाढत्या ब्लड प्रेशरच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांनी दिलेल्या वेळेत औषध घ्या, डोस बदलू नका आणि नियमित तपासणी करून हृदयविकाराचा धोका टाळा.
BP Medicine Timing Advice
Blood Pressure Riskgoogle
Published On

सध्या बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या खाण्यापिण्यात बदल झालेले पाहायला मिळत आहेत. लोक रात्री अपरात्री जागून काम करतायेत आणि दिवसा झोपतायेत. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याच्या, झोपेच्या आणि व्यायामाच्या वेळांवर मोठे बदल पाहायला मिळतायेत. काहींना जास्त कामाच्या ताणामुळे मद्यपानाला सुद्धा आहारी जावं लागत आहे. त्यामुळे हार्ट अटॅकसारख्या जीवघेण्या समस्या तुलनेनं वाढत चालल्या आहेत. त्यातली एक वाढती आणि गंभीर समस्या म्हणजे ब्लड प्रेशर.

ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशरचा धोका असतो. त्यांनी जीवनशैलीत चांगले बदल करणं खूप गरजेचं असतं. धकाधकीच्या जीवनामुळे अनेकांना कमी वयातच या जीवघेण्या समस्येला सामोरं जावं लागतं. त्यात सगळ्यांची होणारी एक चूक म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळेवर न घेणं. बऱ्याच जणांना गोळ्यांबाबत खूप संभ्रम असतो. जर औषधं व्यवस्थित ठरावीक पद्धतीने घेतली तरच त्यावर उपचार योग्य पद्धतीने होऊ शकतात.

BP Medicine Timing Advice
WhatsApp Update: यंदाच्या होळीला उधळा 'व्हॉट्सअ‍ॅप रंग'; Photo Sticker ते व्हॉईस चॅटपर्यंत धम्माल फीचर होणार अपडेट

तुम्ही जर ब्लड प्रेशरच्या समस्येला दुर्लक्षित केलंत, तर तुम्हाला भविष्यात हृदय, मेंदू आणि मूत्रपिंडांसंबंधीत गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं.

त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेत आणि प्रमाणात औषध घ्या. रोज ठरलेल्या वेळेत औषध घेतल्याने रक्तातील औषधाची पातळी स्थिर राहते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. स्वतःहून डोस कमी-जास्त करणं किंवा विसरून औषध चुकवणं धोकादायक ठरू शकते.

औषधांबरोबरच जीवनशैलीत बदल करणे गरजेचं आहे. चांगला घरगुती पौष्टीक आहार, न चुकता किमान १५ मिनिटं व्यायाम, वजन नियंत्रण आणि ताण पुर्णपणे कमी. या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या की तुम्हाला नक्कीच वाढत्या ब्लड प्रेशरपासून सुटका मिळेल.

औषधांचे काही दुष्परिणाम माहिती असणंही आवश्यक आहे. पाय सुजणे, सतत कोरडा खोकला, चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणतेही नवं लक्षण दुर्लक्षित करू नका. रोज रक्तदाबाची तपासणी करा. घरी डिजिटल बीपी मॉनिटरने रक्तदाब मोजून त्याची नोंद ठेवावी आणि फॉलोअपवेळी डॉक्टरांना दाखवा. यामुळे उपचारात आवश्यक बदल करणं सोपं जातं. स्वतःहून इतर औषधे किंवा हर्बल सप्लिमेंट्स घेणं टाळा. काही ओव्हर-द-काउंटर औषधं रक्तदाबावर परिणाम करू शकतात. त्यामुळे आपण घेत असलेल्या सर्व औषधांची माहिती डॉक्टरांना द्यावी. तसेच अचानक औषध बंद करू नका. औषध अचानक थांबवल्याने रक्तदाब झपाट्याने वाढू शकतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

BP Medicine Timing Advice
Dry Hair आणि Hair Fall ने हैराण झालात? हे ५ बेस्ट हेअर मास्क वापरा, सॉफ्ट अन् हेल्दी केस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com