Sakshi Sunil Jadhav
केसांच्या समस्या अनेक महिलांना वर्षानुवर्षे असतातच. पण कधीकधी प्रमाणाच्या बाहेर केस गळत असतील तर भीतीच वाटते.
तुमचे केस जर बऱ्याच दिवसांपासून कोरडे, निस्तेज आणि खराब झाले असतील तर हा हेअर मास्क तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतो.
जेव्हा तुम्ही केसांना हेअर मास्क लावता, तेव्हा केसांना हवं असणारं प्रोटीन त्यांना मिळतं आणि त्यांची वाढ सुरळीत होते.
पुढे आपण केस चमकदार आणि गळण्याच्या समस्येपासून लांब ठेवण्यासाठी काही प्रोडक्ट्सची नावे जाणून घेणार आहोत. ज्याचा वापर तुम्ही तुमच्यासोयीनुसार करू शकता.
केसांना मुळापर्यंत पोशन देण्यासाठी तुम्ही lorealचे हेअर मास्क वापरु शकता. त्याने केस मजबूत होतील.
Dove चे हेअर मास्क हे फ्रिजी केसांना एकदम सॉफ्ट आणि शायनी करायला मदत करतं. तसेच केस सुद्धा मजबूत होतात.
मोरोक्कोनॉइल रिस्टोरेटिव्ह हेअर मास्कने कमकुवत, खराब झालेले केस सुधारतात.
खडबडीत केसांवर तुम्ही हे मास्क लावू शकता. याने केस गुळगुळीत, चमकदार आणि दिर्घकाळ मऊ राहतात.
वेला प्रोफेशनल्स सिस्टम प्रोफेशनल्स लक्सऑइल केराटिन रिस्टोर हेअर मास्कने ताणलेले केस मऊ होतात. व्यवस्थित केस वाढण्यास मदत होते.