Ukad Shenga Recipe: होळीला पुरणपोळीच कशाला? बनवा ओल्या नारळाच्या उकडशेंगा, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

होळी स्पेशल डीश

होळीच्या दिवसात कोकणात बनवला जाणारा एक खास पदार्थ म्हणजे उकडीच्या शेंगा. या मोदकाप्रमाणेच पण करंजीच्या आकारात तयार केल्या जातात.

Coconut modak style sweet

उकडीच्या शेंगांचे साहित्य

पाणी, अर्धी वाटी दूध, १ चमचा तूप, मीठ, २ वाटी तांदळाचे पीठ हे सामान उकडीच्या शेंगांचे आहे.

Coconut modak style sweet

उकडीच्या शेंगांचे सारण

१ चमचा तूप, १ चमचा खसखस, २ वाटी ओलं खोबरं, गुळ, सुका मेवा, अर्धा चमचा वेलची पावडर, जायफळ,तेल हे साहित्य सारणाचे आहे.

Steamed sweet dumplings

स्टेप १

सर्वप्रथम एका पातेल्यात १ ग्लास पाणी, दूध, तूप आणि मीठ चवीनुसार घालून त्याची एक उकळी काढून घ्या.

Steamed sweet dumplings

स्टेप २

आता उकळलेल्या पाण्यात पीठ घालून चांगली उकड काढून घ्या. साधारण अर्धातास झाकून ठेवल्याने पीठ छान तयार होईल. पण गॅस बंद करा.

Steamed sweet dumplings

स्टेप ३

आता एका तव्यात १ चमचा तूप घ्या. मग खसखस फ्राय करा. मग ओलं खोबरं मिक्स करा. शेवटी गुळ आणि ड्रायफ्रुट्स मिक्स करुन घ्या.

Steamed sweet dumplings

स्टेप ४

तयार सारणात जायफळ मिक्स करुन तुमचे सारण तयार होईल. आता उकड काढलेलं पीठ छान मऊसूत मळून घ्या.

Steamed sweet dumplings

स्टेप ५

आता वळलेल्या पीठाचा एक गोळा घेऊन, त्याची पारी बनवा. मग १ चमचा सारण त्यात घालून ती व्यवस्थित बंद करुन घ्या.

Steamed sweet dumplings

स्टेप ६

पारीला बंद केल्यावर तीची कडा पुन्हा फोल्ड करुन घ्या. मग एका मोठ्या चाळणीला तेल किंवा तूप लावून शेंगा ठेवा. मग १० मिनिटे गरम पाण्यावर ही चाळणी ठेवा. तयार आहेत तुमच्या उकडशेंगा.

Steamed sweet dumplings

NEXT: Jio Recharge: Jio चा प्लान एक अन् चालणार ४ सीम कार्ड, जाणून घ्या किती असेल किंमत

Jio family postpaid plan | google
येथे क्लिक करा