Sakshi Sunil Jadhav
उन्हाळा सुरू होताच शरीराच्या गरजा बदलतात. या दिवसांमध्ये थंड, हलके आणि पचायला सोपे असे अन्न खाल्ले पाहिजे.
उन्हाळ्यात अनेकजण त्यांच्या आहारात फळांचा समावेश करतात. पण प्रत्येक फळ उन्हाळ्यात खाल्लच पाहिजे असं नाही.
जर तुम्हीही उन्हाळ्यात आहारात काही बदल करणार असाल तर पुढील फळं खाणं टाळणं तुमच्यासाठी योग्य ठरेल.
पपई पचनासाठी उत्तम मानली जाते. पण उन्हाळ्यात जास्त पपई खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढू शकते. यामुळे पोटात जळजळ, अॅसिडिटी, उलटी किंवा त्वचेवर पुरळ येऊ शकतात.
खजूराची तासीर खूप गरम असते. हिवाळ्यात ऊर्जा देणारा हा फळ उन्हाळ्यात जास्त खाल्ल्यास नाकातून रक्त येणे, तोंडाला फोड येणे, पोटात जळजळ होणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात खजूर टाळणेच योग्य.
केळी आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचन बिघडू शकते. गॅस, बद्धकोष्ठता किंवा अपचनाचा त्रास वाढू शकतो. विशेषतः दुपारच्या वेळी केळे खाणे टाळावे.
आंब्याला फळांचा राजा म्हणतात, पण त्याची तासीरही गरम असते. जास्त आंबे खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढून फोड, पिंपल्स, तोंडाची त्वचा जाणे आणि पोटदुखी होऊ शकते.
लीची गोड आणि रसाळ असली तरी ती गरम तासीराची मानली जाते. जास्त लीची खाल्ल्याने शुगर लेव्हल वाढणे, चक्कर येणे, कमजोरी किंवा डोकेदुखी होऊ शकते.