World Food Safety Day Saam Tv
लाईफस्टाईल

World Food Safety Day: हळदीपासून ते तिखटापर्यंत सर्व मसाल्यांमध्ये मिक्स केली जाते माती; भेसळयुक्त पदार्थ ओळखण्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दरवर्षी ७ जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. जागतिक अन्न सुरक्षा दिन हा लोकांना अन्नाच्या सुरक्षेबाबत जागरुक करण्यासाठी साजरा केला जातो. सध्याच्या काळात अनेकदा आपण बाहेरील जंक फूड खातो, ते शरीरासाठी चांगले नसते. त्याचसोबत आपण अनेक पदार्थ घराबाहेरुन आणते. यामुळेही शरीराला धोका निर्माण होतो. अन्नपदार्थामुळे शरीराला होणारा धोका दूर करण्यासाठी, त्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

आपण जेवण जरी घरी बनवत असलो तरीही त्यात लागणारे मसाले, तेल, भाज्या या सर्व गोष्टी बाहेरुन विकत आणतो. अनेकदा आपण बाहेरील मसाले जेवण बनवण्यासाठी वापरतो. या मसाल्यांमध्ये कधी कधी भेसळ असण्याची शक्यता असते. हे भेसळयुक्त मसाले कसे ओळखायचे, याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

तिखट

तिखटातील भेसळ ओळखण्यासाठी एका ग्लासात पाणी घेऊन त्यात एक चमचा तिखट टाका. ग्लासात खाली असलेली तिखटाची पावडर तुम्ही हातावर चोळा. ही पावडर जर तुम्हाला खडबडीत किंवा रखरखीत लागली तर त्यात अर्धी वीटेची पावडर किंवा वाळूची पावडर टाकली आहे. जर ही पावडर खूपच गुळगुळीत किंवा फेसाळ असेल तर त्यात दगडाची पावडर टाकली असावी.

काळी मिरी

काळी मिरीमध्येही अनेकदा भेसळ केली जाते काळी मिरीमध्ये अनेकदा फळांच्या बिया टाकल्या जातात. विशेषतः पपईच्या बारीक बिया काळी मिरीमध्ये मिक्स केल्या जातात. काळी मिरीमधील भेसळ ओळखण्यासाठी एका प्लेटमध्ये काळी मिरी घ्या. त्या मिरी हाताने दाबा. जर काळी मिरी फुटली तर ती काळी मिरी नाही. काळी मिरी सहसा बोटाच्या साहाय्याने तुटत नाही.

हळद

हळदीला पिवळा रंग देण्यासाठी त्यात भेसळ केली जाते. ही भेसळ ओळखण्यासाठी एका ग्लासात पाण्यात हळद पावडर मिसळा. जर हळद स्थिर राहिली आणि पाणी हलके पिवळे राहिले तर ती हळद भेसळयुक्त नाही. परंतु जर पाण्यात हळदीचा रंग गडद पिवळा झाला, तर ती हळद भेसळयुक्त आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT