
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पविरोधात ऐतिहासिक आंदोलन पेटलं आहे.
७० लाखांहून अधिक अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात जनतेचा रोष व्यक्त होत आहे.
अनेक देशांवर टेरीफ बाँम्ब टाकणारे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमरीकेतच नाराजी आहे. अमेरीकेच्या अनेक प्रांतात त्यांच्याविरोधात मोठं जन आंदोलन झालंय. मात्र हे आंदोलन होण्यामागे नेमकं काय कारण आहे? ट्रम्प प्रशासनाविरोधात जनतेने एल्गार पुकारला पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत जनता आता रस्त्यावर उतरली आहे. आंदोलनकर्त्यंानी अमेरिकेत 2600 हून अधिक ठिकाणी ट्रम्पविरोधी रॅली काढली. या रॅलीत जवळपास 70 लाख नागरिकांनी सहभाग घेतला. नेमकं कशासाठी होतं हे आंदोलन पाहूयात.
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील हे तिसरे मोठे आंदोलन आहे. या आंदोलनाला नो किंग्स प्रोटेस्ट नाव देण्यात आलं. ट्रम्प प्रशासन हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा आरोप आंदोलनातून करण्यात आला. तसचं आंदोलनकर्त्यांनी लोकशाही, न्याय आणि सत्तेच्या गैरवापराविरुद्ध आवाज उठवला. वॉशिंग्टन, डी.सी. आणि न्यू यॉर्क सारख्या प्रमुख शहरांपासून ते मध्यपश्चिमेतील लहान शहरांपर्यंत सर्व 50 राज्यांमध्ये आंदोलन सुरू आहे.
याआधीही जून आणि जुलै महिन्यात ट्रम्पविरोधात नो किंग्स आंदोलन झालं होतं. स्थलांतरितांना हद्दपार केल्यानं आणि गरिबांच्या आरोग्य सुविधेत कपात केल्यामुळे वॉशिंग्टन, लॉस एंजेलिस आणि अनेक रिपब्लिकन शासित राज्यांमध्ये लोक रस्त्यावर उतरले होते. त्यातच आता पुन्हा एकदा आंदोलन झाल्यानं ट्रम्प यांनी एआय-जनरेटेड व्हिडिओद्वारे आंदोलनकर्त्यांना प्रत्युत्तर दिलयं.
20 सेंकदाच्या या व्हिडिओ ट्रम्प मुकुट घालून लढाऊ विमानाच्या पायलटच्या रुपात आहे..त्याच विमानातून आंदोलकांवर विष्ठा फेकण्यात आल्याचं व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलयं. मुळात NO KINGS आंदोलन हे अमेरिकेतील वाढत्या हुकुमशाहीविरोधातील नागरिकांचा एल्गार आहे. त्यामुळे भारतासारखं इतर देशांवर टॅरिफ लादून एकाधिकारशाही गाजवणाऱ्या ट्रम्प यांना स्वत:च्या देशातच नागरिकांच्या संतापाला समोरे जावं लागतयं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.