
येमेनच्या एडन किनाऱ्याजवळ एमव्ही फाल्कन एलपीजी टँकरचा स्फोट झाला त्यानंतर भीषण आग लागली.
खलाशांना जिबूती तटरक्षक दलाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मव्ही फाल्कन एलपीजी टँकरला स्फोट
येमेनमधील एडन किनाऱ्यावर एक मोठी सागरी दुर्घटना घडली आहे. कॅमेरूनचे ध्वज असलेल्या एमव्ही फाल्कनमध्ये मोठा स्फोट झाला. जहाजावरील टॅकरचा स्फोट होताच जहाजाला भीषण आग लागली. हे जहाज येमेनमधील एडन बंदरातून एलपीजी घेऊन आग्नेय दिशेकडील जिबूतीकडे जात होते. त्यावेळी एक मोठा स्फोट झाला.
जहाजावर बहुतेक खलाशी हे भारतीय नागरीक होते. एमव्ही फाल्कनमधील २३ भारतीय क्रू मेंबर्सना वाचवण्यात आले. तर दोन क्रू मेंबर्स अजूनही बेपत्ता आहेत. जहाजात स्फोट झाल्यानंतर आग भडकली. आग भडकल्याचं दिसताच कॅप्टनने मदतीसाठी आपत्कालीन कॉल संदेश पाठवला. त्यानंतर EUNAVFOR Aspide ने ताबडतोब क्रू सदस्यांसाठी शोध आणि बचाव कार्य सुरू केले.
EUNAVFOR Aspides ने या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी केलंय. या निवेदनात Aspides ने म्हटलं की, “एमव्ही फाल्कन जहाजावर २६ जणांचा क्रू होता, त्यापैकी २४ जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलंय तर दोघेजण अजूनही बेपत्ता आहेत. वाचवण्यात आलेल्या क्रू मेंबर्सपैकी २३ जण भारतीय वंशाचे आहेत. तर एक जण युक्रेनियन वंशाचा होता. जहाजातून बाहेर काढण्यात आलेल्या क्रू मेंबर्सना जिबूती बंदरातील तटरक्षक दलाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मध्य समुद्रात कॅमरुन ध्वज असलेले एमव्ही फाल्क जहाज १५ टक्के जळून खाक झाले आहे. यामुळे जहाजाचे मोठे नुकसान झाले आहे. जहाजावर इतका भयानक स्फोट कशामुळे झाला याबाबत कोणतीच माहिती समोर आली नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.