Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची महाष्ट्राच्या राजकारणात होणार एन्ट्री? कोण काय म्हणालं? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Guardian Minister Dispute: डोनाल्ड ट्रम्प यांची यंदा नोबल जिंकण्याची संधी हुकली. पण ती संधी पुन्हा येतीय असं वाटतंय. ती पण नाशिकमधून. आता नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद डोनाल्ड ट्रम्प सोडवणार आहेत ... कसा तर तो असा.
nahsik palakmantri
nahsik palakmantri
Published On

महाराष्ट्राच्या राजकारणात कवा, कधी आणि कशी कुणाची इंट्री हुईल सांगता येत नाय. आता थेट डोनाल्ड तात्या राज्याच्या राजकारणात इंट्री करायला लागल्यात. ती पण नाशकातला सगळ्यात जटिल प्रश्न सोडवून. अन् ती हाय पालकमंत्री पदाचा. हाय का नाय डोक्याला कुटाणा. आता तुम्ही म्हणाल ही काय मोठी भानगड. ऐका आधी भुसे मामा काय म्हणत्यात....

आता एवढा कुटाना वाढला कशापाई तर सांगतू ऐका.राज्यात माहायुतीचं सरकार आलं. पालकमंत्र्याच्या याद्या ठरल्या. नाशिकची माळ पडली महाजन मामाच्या काकाच्या गळ्यात. दादा भुसे फुगून टम्म... महायुतीतला गोडवा टिकावा म्हणून महाजनांनी एक पाय मागे घेतला. तेवढ्यात झाली भुजबळ नानाची एंट्री.. नाना म्हणाले जिल्ह्यात आमचा आमदार जास्त. मंत्रीपद आम्हालाच पाहिजी.. दोघात तिसरा आता सगळी ईसरा... तवा पासून पालकमंत्री पदाचा घोंगडं भिजत पडलंय ती अजून तसंच आहे. आता वाद पोहोचलाय डोनाल्ड तात्याच्या चावडीवर.

nahsik palakmantri
Smriti Mandhana: वर्ल्डकपमध्ये स्मृती मानधनाने मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड, इतिहास रचला

युक्रेन रशियाचा वाद असंल...नाहीतर इजराइल हमास यांच्यातलं युद्ध असंल.. आपलं डोनाल्ड तात्या तिथे हजर. विषय गंभीर असला का डोनाल्ड तात्या खंबीर झालं म्हणून समजा... तात्यांना तेवढा वाद सोडवावा मजी झालं. मग काय पुढच्या वेळीच शांततेचा नोबल पुरस्कार तात्यालाच समजा

nahsik palakmantri
IND vs WI: 'आय लव्ह यू शुभमन', मिस्ट्री गर्लने लाईव्ह मॅचमध्ये केला शुभमन गिलला प्रपोज, फोटो व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com