Closet Organizer Tips: कपाटात कपडे ठेवायला अजिबात जागा नाहीये? मग 'या' टिप्स नक्की वाचा आणि स्पेस मिळवा

Closet Organizer Tips: आपण असंख्य कपडे खरेदी करतो आणि २-३ वेळा घालून ते कपडे असेच कपाटात पडून राहतात. हे कपडे मोठ्या प्रमाणात कपाटाची जागा व्यापतात.
Closet Organizer Tips
Closet Organizer TipsSaam TV

'माझ्याकडे कपडे नाही आणि कपडे ठेवायला मला जागा नाही, काय करू?' हा सर्व मुलींचा कॉमन आणि सतत विचारला जाणारा प्रश्न आहे. या प्रश्नावर एकच रामबाण उपाय म्हणजे नको असेलेले कपडे कपाटातून बाहेर काढून टाकणे.

Closet Organizer Tips
Organic Farming: जैविक शेतीतून मिळवता येतो लाखोंचा नफा, शेतकऱ्यांनी या गोष्टींकडे द्यावं लक्ष

फॅशन आणि स्टाइलच्या नावाखाली आपण असंख्य कपडे खरेदी करतो आणि २-३ वेळा घालून ते कपडे असेच कपाटात पडून राहतात. हे कपडे मोठ्या प्रमाणात कपाटाची जागा व्यापतात. त्यामुळे कपाट उघडताच भरभर कपडे खाली पडू लागतात.

मुलींना प्रत्येक समारंभाला नवीन कपडे हवे असतात. एकदा घातलेले कपडे पुन्हा दुसऱ्या समारंभाला घालून जाणे त्यांना आवडत नाही. त्यामुळे महिन्याला २ टॉप आणि २ महिन्यातून एकदा नवीन ड्रेस सहज घेतला जातो. यामुळे कपाट पूर्ण भरून जातं. कपाट भरल्यानंतर अन्य कपडे त्यात ठेवता येत नाहीत. कपाट ओव्हरप्लो होण्याच्या समस्येवर आम्ही काही उपाय शोधले आहेत.

घट्ट होणारे कपडे वेगळे करा

जुने आणि तुम्हाला फिट न होणारे कपडे तुमच्या कपाटातून काढून टाका. वयानुसार आपल्या शरीराची, अवयवांची वाढ होते. उंच, जाड, बारीक झाल्याने आपल्याला आधीचे कपडे व्यवस्थित फिटींगमध्ये बसत नाहीत. त्यामुळे अशा कपड्या कपाट भरून राहतं.

व्यक्तिमत्त्वाला सूट न होणारे कपडे

सध्या ट्रेंडींगचा जमाना आहे. व्यक्ती विविध ट्रेंडनुसार हटके फॅशन करतात आणि तसेच कपडे घेतात. २-४ वेळा घालून हे कपडे कपाटामध्ये तसेच पडून राहतात. किंवा ड्रेस घेतल्यानंतर घरी आल्यावर ट्राय केल्यानंतर तो परफेक्ट बसत नाही. त्यामुळे आपल्याला कंफर्टेबलही वाटत नाही. त्यामुळे असे कपडे विनाकाराण कपाटात गर्दी करतात.

नको असलेल्या कपड्यांचे काय करावे?

नको असलेल्या कपड्यांपैकी चांगले कपडे बाजूला काढून तुम्ही अनाथाश्रमात दान करू शकता. यामुळे त्या लोकांना कपडे मिळतील आणि तुम्हाला पुण्य लाभेते. काही कपड्यांपासून तुम्ही घरासाठी पायपुसणी, पिशव्या, गोधडी, मास्क देखील तयार करू शकता.

Closet Organizer Tips
Organic Papaya Farming: उच्चशिक्षित शेतकऱ्याची सेंद्रिय पद्धतीने पपईची शेती; रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारले गोमूत्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com