Rohini Gudaghe
पावसाळ्यात कपडे घट्ट पिळून वाळत घाला. त्यामुळे लवकर सुकतील.
कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनचा वापर करणार असाल, तर कपडे मशीनमधून वाळवून घ्या.
कपडे धुताना कोमट पाण्याचा वापर करा. त्यामुळे कपड्यांमध्ये दमटपणा येवून लवकर कोरडे होतात.
कपडे वाळत घालताना त्यामध्ये पुरेसे अंतर ठेवा. कपडे लवकर कोरडे होतील.
शर्ट यांसारख्या कपड्यांना सुकवण्यासाठी हॅंगरचा वापर करा.
घरात कपडे वाळत घालत असल्यास खिडकी उघडी ठेवा. हवा खेळती राहून कपडे लवकर सुकतील.
कपडे ९० टक्के सुकल्यावर इस्त्री फिरवून ठेवू शकता.
पावसाळ्यात कपड्यांना वास येतो. त्यामुळे कपडे धुताना पाण्यात व्हिनेगर घाला.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे.