चीनमध्ये मानवरूपी रोबोट बाळाला जन्म देणार आहे.
कृत्रिम गर्भाशयात बाळ नऊ महिने वाढेल.
रोबोटमध्ये गर्भधारणा आणि प्रसूतीची प्रक्रिया घडवण्याचा प्रयत्न आहे.
चीनमधील शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, जगातील पहिला मानवरूपी (ह्यूमनॉइड) रोबोट लवकरच बाळाला जन्म देऊ शकणार आहे. ग्वांगझौ मधील कायवा टेक्नॉलॉजीचे डॉ. झांग किफेंग यांच्या नेतृत्वाखाली हे प्रोजेक्ट सुरू आहे. या प्रोजेक्टचा उद्देश कृत्रिम गर्भाशयाच्या मदतीने गर्भधारणेची प्रक्रिया रोबोटमध्ये घडवून आणणं हा आहे.
या तंत्रज्ञानानुसार बाळ रोबोटच्या शरीरातील कृत्रिम गर्भाशयासारख्या जागेत वाढणार आहे. या गर्भाशयात कृत्रिम अम्निओटिक फ्लुइड (गर्भजलासारखा द्रव) असेल. बाळ नऊ महिने या जागेत वाढेल आणि त्याला नाळेसारख्या ट्यूबमधून पोषण मिळेल. त्यानंतर नैसर्गिक पद्धतीने प्रसूती होणार आहे.
डॉ. झांग यांनी आधीच ग्वांगडोंग प्रशासनाशी चर्चा सुरू केली आहे. जेणेकरून या तंत्रज्ञानासाठी कायदे आणि नियम तयार करता येतील. त्यांच्या म्हणण्यानुसार, तंत्रज्ञान आता mature stage मध्ये पोहोचली आहे. फक्त ते रोबोटच्या पोटात बसवायचं आहे, ज्यामुळे खऱ्या व्यक्ती आणि रोबोट यांच्यात परस्पर संवाद साधता येणार आहे आणि गर्भधारणा शक्य होणार आहे.
अहवालानुसार, या प्रोजेक्टचा पहिला नमुना पुढच्या वर्षी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो. त्याची किंमत सुमारे १ लाख युआन (१२ लाख रुपये पेक्षा अधिक) असू शकते. हा ह्यूमनॉइड रोबोट गर्भधारणा ते प्रसूतीपर्यंतचा संपूर्ण प्रवास दाखवू शकेल, असे सांगण्यात येत आहे.
अद्याप नेमकी फलन प्रक्रिया (फर्टिलायझेशन) कशी होईल याची स्पष्टता नाही. भ्रूण रोबोटच्या कृत्रिम गर्भाशयात कसा बसवला जाईल, हे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलेलं नाही. मात्र, काही संशोधक म्हणतात की, ही संकल्पना पूर्वीच्या त्या प्रयोगांवर आधारित आहे.
या नवीन कल्पनेमुळे मोठा कायदेशीर आणि नैतिक वाद निर्माण झाला आहे. समर्थकांचं म्हणणं आहे की, हा शोध भविष्यात वैद्यकीय क्षेत्र आणि कौटुंबिक जीवनात आमूलाग्र बदल घडवू शकतो. तर विरोधकांचं मत आहे की यामुळे समाजात नैतिकतेचे मोठे प्रश्न उभे राहतील.
चीनमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसतेय. २००७ मध्ये हे प्रमाण ११.९% इतके होते, तर २०२० मध्ये ते वाढून १८% झाले. या पार्श्वभूमीवर या नव्या कल्पनेकडे एक मोठ्या उपाययोजनेच्या रूपात पाहिले जात आहे.
रोबोटमध्ये बाळाच्या वाढीसाठी कोणती व्यवस्था केली जात आहे?
रोबोटमध्ये कृत्रिम गर्भाशय आणि अम्निओटिक फ्लुइडची व्यवस्था केली जात आहे.
हा प्रोजेक्ट कोणत्या शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली सुरू आहे?
ग्वांगझौमधील कायवा टेक्नॉलॉजीचे डॉ. झांग किफेंग यांच्या नेतृत्वाखाली हा प्रोजेक्ट सुरू आहे.
रोबोटमध्ये गर्भधारणेची प्रक्रिया किती काळ चालेल?
बाळ रोबोटच्या कृत्रिम गर्भाशयात नऊ महिने वाढेल.
रोबोटची अंदाजित किंमत किती आहे?
रोबोटची किंमत सुमारे १ लाख युआन (१२ लाख रुपये) असू शकते.
चीनमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण २०२० साली किती झाले?
चीनमध्ये २०२० मध्ये वंध्यत्वाचे प्रमाण १८% झाले.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.