BJP Rajya Sabha Candidate: हिंगोलीच्या सुपुत्राला भाजपनं खासदार केलं, कोण आहेत रामराव वडकुते?

Siddhi Hande

निवडणुकीसाठी यादी

भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी यादी जाहीर केली आहे. यामध्ये रामराव वडकुते यांना संधी दिली आहे.

BJP Rajyasabha Candidate Ramrao Wadkute

माजी आमदार

रामराव वडकुते हे हिंगोलीचे माजी आमदार आहेत. ते सध्या हिंगोली भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतात.

BJP Rajyasabha Candidate Ramrao Wadkute

राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुरुवात

रामराव वडकुते यांनी शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजकारणाची सुरुवात केली होती.

BJP Rajyasabha Candidate Ramrao Wadkute

रामराव वडकुते यांचा पराभव

कळमनुरी विधानसभा निवडणुकीत रामराव वडकुते यांचा पराभव झाला होता.

BJP Rajyasabha Candidate Ramrao Wadkute

शेळी मेंढी महामंडळाचे अध्यक्ष

शेळी मेंढी महामंडळाचे अध्यक्षपद रामराव वडकुतेंनी भूषवले आहे.

BJP Rajyasabha Candidate Ramrao Wadkute

विधानपरिषदेचे सदस्य

विधान परिषदेच्या सदस्य पदी शरद पवारांनी माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांना डावलून उमेदवारी दिली होती.

BJP Rajyasabha Candidate Ramrao Wadkute

दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश

यानंतर रामराव वडकुते यांनी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी मधून भाजपामध्ये प्रवेश केला होता.

BJP Rajyasabha Candidate Ramrao Wadkute

जिल्हाध्यक्ष

भाजपामध्ये जिल्हाध्यक्षपदावर त्यांची वर्णी लागली होती. यानंतर रामराव वडकुतेंना थेट राज्यसभेचे उमेदवारी दिली आहे.

BJP Rajyasabha Candidate Ramrao Wadkute

हिंगोलीत दुसऱ्यांदा राज्यसभा खासदार पद

मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याला राजू सातव यांच्यानंतर दुसऱ्यांदा राज्यसभेचा खासदार रामराव वडकुते यांच्या रूपाने मिळणार आहे.

BJP Rajyasabha Candidate Ramrao Wadkute

Next: इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांची संपत्ती किती?

Iran New Supreme Leader Mojtaba Khamenei
येथे क्लिक करा