World Breastfeeding Week 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

World Breastfeeding Week 2023: थायरॉईड असणाऱ्या स्त्रियांनी स्तनपान केले पाहिजे का? यामुळे बाळाला धोका निर्माण होतो का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

कोमल दामुद्रे

Breastfeeding and Thyroid:

दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत जगभरात 'जागतिक स्तनपान सप्ताह' साजरा केला जातो. हा संपूर्ण आठवडा बाळ व आईच्या काळजीसाठी साजरा केला जातो. नुकत्याच झालेल्या मातांच्या व नवजात बाळाच्या आरोग्यासाठी स्तनपानाच्या महत्त्वाबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

बरेचदा अनेक स्त्रियांना थायरॉईडचा आजार असतो. यामध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे थायरॉईड झाल्यानंतरही महिला गर्भधारणा करू शकतात. यामध्ये सगळ्यात मोठी समस्या स्त्रीला तिच्या बाळाला स्तनपान करावे लागते. कारण थायरॉईडचा स्तनपानावर वाईट परिणाम होऊ शकतो. थायरॉईड ग्रंथीचे कार्य हार्मोन्स तयार करणे आहे, जे शरीराच्या वाढीस आणि त्याच्या आवश्यक कार्यांमध्ये मदत करतात. हे हार्मोन स्तनपानासाठी देखील आवश्यक आहे. मग थायरॉईडने त्रस्त असलेल्या आईने आपल्या बाळाला स्तनपान करू नये का? असा प्रश्न पडतो जाणून घेऊया याबद्दल.

1. थायरॉईडच्या आजाराची लक्षणे

थायरॉईडचे (Thyroid) दोन प्रकार आहेत. हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम. हायपोथायरॉईडीझम थायरॉईडमध्ये थकवा, बद्धकोष्ठता, कोरडी त्वचा, चेहऱ्यावर सूज येणे, मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारखी लक्षणे आहेत. तर, हायपरथायरॉईडीझमच्या लक्षणांमध्ये (Symptoms) जास्त घाम येणे, निद्रानाश आणि थकवा यांचा समावेश होतो. यापैकी कोणतीही लक्षणे स्तनपानादरम्यान दिसल्यास, तुम्ही थायरॉईड तपासणी करून घ्यावी व डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा

2. थायरॉईड असताना बाळाला स्तनपान करावे का?

थायरॉईड असलेल्या बर्‍याच महिलांना काळजी (Care) असते की त्यांनी आपल्या बाळाला स्तनपान केले तर त्याचा परिणाम त्यांच्या बाळावरही होऊ शकतो. ओरा क्लिनिकच्या डॉ. रितू सेठी म्हणतात की, जर थायरॉईडच्या आजारावर योग्य तो औषधोपचार केला तर स्तनपान करताना त्याचा त्रास कमी होतो.

परंतु हायपोथायरॉईडीझमची काळजी न घेतल्यास त्याचा आईच्या दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाळाला दुध पाजताना थायरॉईडचे औषध घेणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवा.

गर्भधारणेदरम्यान स्त्रीच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. या कारणास्तव थायरॉईडमध्येही बदल होतात. बाळाच्या वाढीसाठी स्तनपान सर्वात फायदेशीर आहे, परंतु काही प्रकरणांमध्ये, स्तनपानामुळे, थायरॉईड ग्रंथी आवश्यकतेपेक्षा जास्त हार्मोन्स तयार करू लागते.

3. स्तनपानामुळे थायरॉईडपासूनही संरक्षण मिळू शकते

स्तनपानामुळे आई आणि मूल दोघांमध्ये थायरॉईडची समस्या टाळता येते. नियमित स्तनपान केल्याने ऑटोइम्यून थायरॉईड नियंत्रित करण्यात मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT