World Book Day 2024
World Book Day 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

World Book Day 2024: फक्त अभ्यासासाठी नव्हे तर शारिरिक आणि मानसिक विकासासाठी पुस्तके महत्त्वाची; जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगभरात २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात पुस्तकाचे अनन्यासाधारण महत्त्व असते. प्रत्येकाने आपल्या शालेय वयात ते अगदी म्हातारे होईपर्यंत एक तरी पुस्तक वाचलेच असेल. पुस्तके आपल्या खूप काही शिकवतात. खऱ्या आयुष्यात कस जगायचं, कसं वागायचं हेदेखील अनेकदा पुस्तकेच शिकवतात. पुस्तके ही फक्त वाचण्यापुरती मर्यादित नसतात. तर ती आत्मसात करायची असतात. पुस्तकातील काही अनुभव आपल्याला खऱ्या आयुष्यात खूप काही शिकवतात. त्यामुळे लहानांपासून ते अगदी मोठ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकालाच पुस्तके खूप काही शिकवतात.

पुस्तकांबद्दल लोकांची आवड वाढावी, लोकांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत आणि लेखकांना सन्मान मिळावा या उद्देशाने जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. १९९५ मध्ये युनेस्कोची एक बेठक झाली होती. त्याचवेळी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुस्तके वाचणे ही खूप चांगली सवय आहे. आजकाल ऑनलाइन वाचण्याचा ट्रेंड सुरु आहे. परंतु पुस्तके हातात घेऊन वाचण्यात एक वेगळीच मज्जा असते. पुस्तके वाचण्याटे शारिरीक आणि मानसिक दोन्ही फायदे आहेत.

झोपेची गुणवत्ता सुधारते

अनेकदा काही जणांना लवकर झोप येत नाही. त्यांचे झोपेचे वेळापत्रक व्यवस्थित नसते. यामुळे त्यांना खूप त्रास होतो. जर तुम्हालाही अशी सवय असेल तर तुम्ही पुस्तके वाचा. पुस्तके वाचल्यावर तुम्हाला खूप चांगली झोप लागते.

तणावापासून मुक्तता

सध्याच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतः साठी वेळ मिळत नाही. त्यामुळे ते खूप एकटे पडतात, त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होतात. या परिस्थितीत तुम्ही स्वतः ला वेळ देण्यासाठी पुस्तके वाचा. नवीन गोष्टी आत्मसात करा जेणेकरुन तुम्हाला एकटे वाटणार नाही.

मेंदूचा विकास होतो

मेंदूच्या विकासासाठी पुस्तके खूप जास्त चांगली आहेत. पुस्तके वाचल्याने अनेक गोष्टी समजतात. त्यामुळे मेंदूला चालना मिळते. मेंदूला चालना मिळाल्याने माणसाचा बौद्धिक विकास होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: इंडिया आघाडी सत्तेत आल्यास तुम्ही पंतप्रधान बनणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, 'आमचं ठरलंय की...'

Chess Playing Benefits: बुद्धिबळ खेळण्याचे जाणून 'घ्या' फायदे

अमरावती : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पांढरा कांदा झाला काळा; चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक नुकसान

Manoj jarange Patil: 'दिलेला त्रास विसरु नका, मतांमधून ताकद दाखवा', जरांगे पाटलांचे आवाहन; विधानसभेबाबत केली मोठी घोषणा!

Fashion Beauty Tips : 'हे' ५ दागिने महिलांकडे असलेच पाहिजेत; ऑफिससह, लग्नसमारंभात तुम्हीच दिसाल उठून

SCROLL FOR NEXT