Sanjay Rathod: सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करणार; विद्यार्थ्यांसाठी संजय राठोड यांचा पुढाकार

UPSC-MPSC Books: स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या गरीब व होतकरू युवकयुवतींसाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी आज दिली आहे.
Sanjay Rathod
Sanjay RathodSaam TV

Sanjay Rathod:

सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न प्रत्येक तरुण पाहत असतो. त्यासाठी तरुण रात्रंदिवस मेहनत करतात. अशात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासासाठी अनेकवेळा पुस्तकं देखील उपलब्ध होत नाही. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून पालकमंत्री संजय राठोड यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Sanjay Rathod
Jalgaon Manoj Jaranage Patil News: नारायण कुचे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल!

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी जास्त नसतात. शेती किंवा इतर व्यवसायावर उदनिर्वाह करत तरुण आपलं पोट भरतात. कुटुंबाचा भार संभाळत अभ्यासासाठी पुस्तकं विकत घेणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या गरीब व होतकरू युवकयुवतींसाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी आज दिली आहे.

नेर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज पार पडला. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या अभियानाअंतर्गत नेर तालुक्यातील सर्व ५१ ग्रामपंचायतींना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तक व साहित्याचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या अनेक पदभरत्या सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यात ७५ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. युपीएससी, एमपीएससी, सरळसेवा या स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी ग्रामीण भागातील युवकयुवतींना मोफत स्पर्धा परीक्षांचा पुस्तके ग्रामपंचायत, शाळा, संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली जात आहेत.

यासह स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नामांकीत व्यक्तींचे मार्गदर्शनही मिळणार आहे. ‘गाव तिथे वाचनालय’ या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना पुस्तक दिल्यानंतर त्यांचा योग्य वापर होतो की नाही याची तपासणी देखील केली जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॅा. पवन बन्सोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मैनाक घोष, प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसिलदार, गटविकास अधिकारी, सरपंच, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Sanjay Rathod
Amravati Crime News : दुचाकी चाेरीसाठी मास्टर चाव्यांचा वापर, 29 बाईकसह एकास अटक; सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com