कोमल दामुद्रे
आरोग्यासाठी नियमितपणे ८ ते ९ तास झोप घेणे गरजेचे आहे.
अनेकदा रात्रीच्या वेळी आपल्यामध्येच जाग येते परंतु, असे वारंवार होत असेल तर दुर्लक्ष करु नका.
आरोग्य स्थिती, वृद्धत्व, वातावरण, आहार आणि औषधे यासारख्या गोष्टींमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.
चिंता आणि तणावामुळे झोपच्या आरोग्यावर परिणाम होतो.
वाढत्या वयानुसार झोपेची गुणवत्ता कमी होते. हार्मोन्स बदल होतात.
चांगल्या झोपेसाठी शांत वातावरणाची देखील गरज आहे.
जर सतत कॉफी, चॉकलेट, ब्लॅक किंवा ग्रीन टी पित असाल तर झोपेवर परिणाम होऊ शकतो.