Diabetes Health : मधुमेहींनो, चुकूनही या ६ पदार्थांचे सेवन करु नका; रक्तातील साखर भरभर वाढेल

Diabetes Tips : बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, सततचा ताण यामुळे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धातील अनेकांना मधुमेहाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मधुमेहाचा आजार हा शरीरातील हार्मोन्स असंतुलन झाल्यावर होतो.
Diabetes Health
Diabetes HealthSaam Tv
Published On

Do Not Eat These 6 things in Diabetes :

बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, सततचा ताण यामुळे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धातील अनेकांना मधुमेहाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मधुमेहाचा आजार हा शरीरातील हार्मोन्स असंतुलन झाल्यावर होतो.

सध्या जगभरात मधुमेहाचे (Diabetes) रुग्ण सतत वाढत आहे. मधुमेहाच्या आजारात औषधांपेक्षा आहाराकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. रक्तातील साखर (Sugar) नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करुन नये जाणून घ्या.

टाइप 1 मधुमेह

टाइप १ मधुमेह अशी स्थिती आहे यामध्ये तुमचे शरीर इन्सुलिन तयार करु शकत नाही. याला किशोर मधुमेह म्हणून ओळखले जाते. हा आजार लहान मुले आणि किशोरवयीन मुलांना होतो. यामध्ये रोगप्रतिकारशक्ती स्वत: च इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करतात.

Diabetes Health
Diabetes Health : मधुमेहींनो, आहारात करा या ५ भाज्यांचा समावेश, राहाल निरोगी

आहारात कोणत्या ६ पदार्थांचे सेवन टाळायला हवे जाणून घेऊया

1. ट्रान्स फॅट

मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांनी त्यांच्या अन्नातील चरबी आणि तेलकट पदार्थांचे सेवन नियंत्रित करायला हवे. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. तसेच आहारात थेटिक हायड्रोजनेटेड वनस्पती तेलचा समावेश करु नका हे आरोग्यासाठी (Health) हानिकारक आहे.

2. उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे

मधुमेहामध्ये नेहमी कमी ग्लायसेमिक असलेल्या फळांचा समावेश करावा. यामध्ये बेरी, ग्रेपफ्रूट, पीच, नाशपती, संत्री आणि जर्दाळू इत्यादी फळे खाऊ शकता. कलिंगड आणि अननसामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो.

Diabetes Health
Diabetes Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी हे ५ पदार्थ खायलाच हवे, रक्तातील साखर राहिल नियंत्रणात

3. रिफाइंड पीठ

रिफाइंड पीठ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप धोकादायक आहे. शरीरात गेल्यानंतर ते झपाट्याने ग्लुकोजमध्ये रुपांतरित होते. ज्यामुळे रक्तातील साखर वाढते.

4. तळलेले पदार्थ

तळलेल्या पदार्थांमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे रक्तातील साखर वाढते. मधुमेहाच्या रुग्णांनी तळलेले पदार्थ खाणे टाळावे.

Diabetes Health
Remedies for Stomach Worms: मुलांच्या पोटात जंत झाल्यानंतर शरीरात दिसतात ही लक्षणे, वेळीच घ्या काळजी

5. मद्यपान

मधुमेह असलेल्या लोकांनी अल्कोहोलचे सेवन टाळावे. रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने ग्लुकोजच्या पातळीचा धोका वाढू शकतो. ज्यामुळे परिस्थिती गंभीर होऊन रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता आहे.

6. मीठ

मीठाचे अतिप्रमाणात सेवन करु नका. हे अन्न आणि उच्च रक्तदाबाचे प्रमुख कारण मानले जाते. यासाठी रोजच्या आहारात याचे सेवन प्रमाणात करा. बटाटा, चिप्स , फ्रेंच फ्राइज सारख्या पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण अधिक असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com