कोमल दामुद्रे
हल्ली प्रत्येक वयोगटातील लोकांना मधुमेहाच्या समस्यांना समोरे जावे लागत आहे. यासाठी त्यांनी आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे. खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीतील बदलांमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात.
जर तुम्हालाही मधुमेह असेल तर आहारात या भाज्यांचा समावेश करा
कारले चवीला अंत्यत कडू असते. पण यात असणारे घटक मधुमेहाच्या रुग्णासाठी रामबाण आहे. त्यात पॉलीपेप्टाइड-पी नावाचा घटक आहे ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहाते.
मुळ्यामध्ये पोषक तत्वे असतात. यात असणारे बीटा-कॅरेटीन आणि व्हिटॅमिन क मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यातील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि फायबरमुळे साखरेची पातळी कमी होते.
या भाजीमध्ये व्हिटॅमिन के आणि फोलेट मुबलक प्रमाणात असते. ब्रोकोली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.
दुधीभोपळामध्ये ग्लुकोजचे प्रमाण कमी असते. याचा आहारात समावेश केल्याने मधुमेहाची समस्या कमी होते.