Maharashtra Local Body Election Results 2025 Live : तुमचा नगराध्यक्ष कोण? पालिकेवर सत्ता कुणाची? वाचा लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live Update city wise : राज्यातील 246 नगरपरिषदा (Municipal Councils), 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीची (Nagar Panchayat Election Result 2025) मतमोजणी आज होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात होई. तुमच्या शहरात कुणाची सत्ता येणार? कोण नगराध्यक्ष होणार? याबाबतचे अपडेट जाणून घ्या..
Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live Update
Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live UpdateSaam TV Marahi News

थोड्याच वेळात मतमोजणी, पुण्यात जमावबंदी लागू...!

उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, मंचर, शिरूर, राजगुरुनगर आणि चाकण या नगरपरिषदांच्या निवडणुकीचे निकालाच्या आनंदाला कायद्याचे निर्बंध लागु करण्यात आलेत

निकालाची उत्सुकता सर्वच स्तरांवर शिगेला पोहोचली असून, समर्थकांमध्ये विजयाचा आनंद साजरा करण्याची लगबग सुरू आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे विजयाचा आनंद साजरा करता येईल, पण जल्लोषाला मात्र निर्बंध घालण्यात आले आहेत.

Local Body Election : मतमोजणीआधीच भाजपचा जल्लोष अन् घोषणाबाजी

अक्कलकोटमध्ये मतमोजणी सुरू होण्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला सुरुवात

फटक्यांची आतिषबाजी करत आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष

मतमोजणी सुरु होण्याआधीच अक्कलकोटमध्ये झळकले अभिनंदनाचे बॅनर

भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी यांच्या अभिनंदनाचे बॅनर अक्कलकोट शहरात झळकले

अक्कलकोटमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट विरुद्ध काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे

ज्यामध्ये भाजपतर्फे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी, काँग्रेसतर्फे अशपाक बळोरगी, शिवसेना शिंदे गटातर्फे रईस टिनवाला हे उमेदवार आहेत

भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा इतका आत्मविश्वास आहे की मतमोजणी सुरु होण्याआधीच मिलन कल्याणशेट्टी यांचे नगराध्यक्ष म्हणून अभिनंदनाचे बॅनर शहरभर लावण्यात आलेत

Baramati Election result : बारामतीत काही वेळात होणार मतमोजणीला सुरुवात, कोण बाजी मारणार?

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती नगर परिषदेची निवडणूक काल पार पडली. या नगर परिषदेची मतमोजणी आज होत असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने इतर पक्षांना सोबत घेत पॅनल उभा केला आहे, भाजपाने देखील आपला स्वतंत्र पॅनल पवार यांच्या विरोधात उभा केला आहे, तर शिवसेना एकनाथ शिंदे गट बहुजन समाज पक्ष यांनी आपला पॅनल उभा केला आहे. बारामतीत अजित पवार गटाला आठ जागा आतापर्यंत बिनविरोध निवडून आले आहेत 33 जागांसाठी आणि एक नगराध्यक्ष पद याकरिता आज मतमोजणी होत आहे मतदान केंद्रावरून आढावा घेतला आहे

bhandara : भंडाऱ्यात 622 नगरसेवक उमेदवार तर 35 नगराध्यक्षांच्या उमेदवाराचा फैसला आज

भंडारा जिल्ह्यात चारही ठिकाणच्या नगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होत आहे. भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली-सेंदूरवाफा या चार ठिकाणी होत असलेल्या मतमोजणीसाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. सुमारे ५०० वर अधिकारी कर्मचारी आणि जवळपास तेवढाच पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त मतमोजणी केंद्रावर राहणार आहे.सकाळी दहा वाजता पोस्टल बॅलेटने मतमोजणी सुरू होऊन नंतर ईव्हीएम उघडले जातील. अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला निकाल सकाळी १०:३० वाजता जाहीर होण्याची शक्यता आहे, तर शेवटचा निकाल दुपारी १:३० ते २ वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

Ambarnath Election Result : अंबरनाथ पालिका निवडणूक : आज मतमोजणी, नगराध्यक्ष पदाची चुरशीची लढत

अंबरनाथ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत 208 बोगस मतदार, हाणामारी व राडा अशा घटनांमुळे राज्यभरात मोठी चर्चा झाली. 29 प्रभागांमधील 59 उमेदवारांचे भवितव्य या निवडणुकीत बंदिस्त झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या मनीषाताई वाळेकर आणि भाजपच्या तेजश्री करंजुले यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. आज सकाळी 10 वाजता अंबरनाथमधील महात्मा गांधी शाळेत मतमोजणी सुरू होणार असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Latur local body Election : लातूर जिल्ह्यातील चार नगरपालिका आणि एक नगरपंचायतीच्या मतमोजणी

लातूर जिल्ह्यातील 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मतमोजणीला काही वेळात सुरुवात होणार आहे, जिल्ह्यातील औसा निलंगा ,अहमदपूर, उदगीर , या नगरपालिकासह रेणापूर नगरपंचायत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, हे सगळ निकालाच चित्र दुपार पर्यंत स्पष्ट होईल, मतमोजणी केंद्रांवर सुरक्षेच्या कारणाने पोलिसांनी देखील दगड बंदोबस्त लावला आहे

palghar Election Result : पालघर जिल्ह्यात तीन नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतीसाठी आत होणार मतमोजणी

मतमोजणीला सकाळी 10 वाजेपासून होणार सुरुवात

•पालघर, डहाणू ,जव्हार या तीन नगरपरिषदा तर वाडा या एका नगरपंचायतीवर कोण फडकवणारा झेंडा याकडे सर्वांचे लक्ष

•चार नगराध्यक्ष पदासाठी 17 उमेदवार तर 94 नगरसेवक पदासाठी 316 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.

•भाजपची जिल्ह्यात मित्र पक्षांसह विरोधकांशी असणार थेट लढत.

•जिल्ह्यातील मत मोजणी केंद्र बाहेर पोलिसांचा असणार चौक बंदोबस्त

Pune Local Body Election result : उत्तर पुणे जिल्ह्यातील सहा नगरपरिषदेच्या निवडणूकीची मतमोजणी आज होणार

जुन्नर शिरुर मंचर राजगुरुनगर चाकण नगरपरिषदेच्या निवडणूकीत आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती या नगरपरिषदेतील विजय हा फक्त नगराध्यक्षपदापुरता मर्यादित नसुन आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठीचा पाया असणार आहे त्यामुळे या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागुन राहिलं असताना हि निवडणूक चुरशीची ठरली असुन उत्तर पुणे जिल्ह्यात शिरुर वघळता चारही ठिकाणी महायुतीची एकमेकांविरोधात लढत होती त्यातच राज्यातल्या दिग्गज नेत्यांनी सभा घेऊन चुरशी लढत केली होती त्यामुळे निकालाचा कल कोणाच्या बाजुने झुकतोय याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे

nashik nagar parishad result Live :  नाशिक जिल्ह्यातील 14 नगर परिषदांसाठी आज मतमोजणी

नाशिकच्या जिल्ह्यातील 14 नगर परिषदांसाठी आज मतमोजणी होत असून जिल्ह्यात सर्वात मोठी व चर्चेत राहिलेल्या नगर परिषद असलेल्या मनमाड नगर परिषदेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.मतमोजणीच्या निमित्ताने प्रशासनाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे.सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरवात करण्यात येणार आहे.निवडणुकीच्या निमित्ताने येवल्यात मंत्री छगन भुजबळ , तर मनमाड, नांदगाव आमदार सुहास कांदे यांच्यासह अनेक दिग्गज उमेदवाराच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहे.

Maharashtra Local Body Election Results 2025 Live :  मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील ५२ नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ५२ नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आज लागणार असून, विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ते स्पष्ट होईल. मराठवाड्यात ५२ नगराध्यक्ष आणि १,२४६ सदस्यांची निवड होणार आहे. अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या या निवडणुकीत कोणत्या पक्षाकडे सर्वाधिक नगराध्यक्षपदे आणि नगरपालिका राहणार याकडेही लक्ष असणार आहे. १० वाजता उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक १३ नगरपालिकांत मतमोजणी होणार असून, या ठिकाणी १३ नगराध्यक्षांसह २६९ नगरसेवक निवडून येणार आहेत. यंदा नगर परिषदेच्या निवडणुकीतही विविध पक्षांत मोठी चुरस दिसली. त्यामुळे स्थानिक पातळीवरील विविध पक्षांतील आमदार आणि खासदारांच्या नेतृत्वाची कसोटीही लागली होती.

Maharashtra Local Body Election Results 2025 Live : या नगर परिषद / नगरपंचायतींची होणार मतमोजणी :

छत्रपती संभाजीनगर (७): फुलंब्री (न.पं.), गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, सिल्लोड, वैजापूर

जालना (३) : अंबड, भोकरदन, परतूर

नांदेड (१३) : बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर (न.पं.), कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट, लोहा

परभणी (७) : गंगाखेड, जिंतूर, मानवत, पाथरी, पूर्णा, सेलू, सोनपेठ

बीड (६) : अंबेजोगाई, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, परळी-वैजनाथ

लातूर (५) : अहमदपूर, औसा, निलंगा, रेणापूर (न.पं.), उदगीर

हिंगोली (३) : हिंगोली, वसमत, कळमनुरी

धाराशिव (८) : भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, धाराशिव, परंडा, तुळजापूर, उमरगा

Maharashtra Local Body Election Results 2025 Live : मराठवाड्यातून किती नगराध्यक्ष, किती नगरसेवक निवडून येणार?

छत्रपती संभाजीनगर :

नगराध्यक्ष :७

नगरसेवक : १६०

जालना :

नगराध्यक्ष : ३

नगरसेवक : ६५

बीड :

नगराध्यक्ष :६

नगरसेवक : १८६

परभणी :

नगराध्यक्ष : ७

नगरसेवक : १६५

हिंगोली :

नगराध्यक्ष : ३

नगरसेवक : ८४

नांदेड :

नगराध्यक्ष: १३

नगरसेवक : २६९

लातूर :

नगराध्यक्ष : ५

नगरसेवक : १२८

धाराशिव :

नगराध्यक्ष : ८

नगरसेवक : १८९

amrawati local body Election : अमरावती जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 2 नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला 10 वाजता पासून होणार सुरुवात

अमरावती जिल्ह्यातील 155 प्रभागात 278 नगरसेवक निवडल्या जात असून यामध्ये सदस्य पदासाठी 612 स्त्री व 638 पुरुष असे 1 250 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर 12 नगराध्यक्ष पदाकरिता 47 स्त्री व 24 पुरुष असे71 उमेदवारांच्या भवितव्याचा आज लागणार निकाल

या मतमोजणीच्या बंदोबस्तासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला...

नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे खासदार अनिल बोंडे माजी खासदार नवनीत राणा यांनी घेतल्या होत्या प्रचारसभा.तर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर,खासदार बळवंत वानखेडे हे सुद्धा प्रचारात उतरले होते. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सर्व दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे

Local Body Election : रत्नागिरीती नगर परिषद आणि नगर पंचायतींचा आज निकाल

जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या चार प्रमुख नगर परिषदांसह लांजा, देवरुख आणि गुहागर या तीन नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज एकाचवेळी पार पडणार

सात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 68.14 टक्के झालं होतं मतदान

सात नगराध्यक्षपदासाठी 33 तर नगरसेवकपदाच्या 151 जागांसाठी 461 उमेदवार रिंगणात

10 वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी 1 वाजेपर्यंत निकालाचं अंतिम चित्र स्पष्ट होणार

कमी मतदान आणि कमी फेऱ्या असलेल्या गुहागर आणि राजापूरचा निकाल लवकर जाहीर होणार

थेट नगराध्यक्ष निवडींमुळे रोमांचक चित्र.. जोरदार राजकीय चुरस

मतमोजणीसाठी जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त

Beed Election Result : बीड जिल्ह्यातील सहा नगरपरिषदेच्या निवडणुकांची आज मतमोजणी

बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या निवडणुकांची मतमोजणी असून यामध्ये बीड गेवराई माजलगाव धारूर आंबेजोगाई परळी या नगर परिषदेचा निकाल आज लागणार असून यासाठी आता जिल्हा प्रशासन अलर्ट वरती असून दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 400 अंमलदार आरसीबी आरसीएफ पोलिसांचा मोठा फौज फाटा असणार आहे त्याचबरोबर बीड मधील नगर परिषदेमध्ये 13फेऱ्या असून ठीक दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे या संपूर्ण परिस्थितीवर बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन व बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे लक्ष ठेवून असणार आहे

hingoli Local Body Election Results 2025 Live : मोबाईल आढळला तर कडक कारवाई होणार

मतमोजणी प्रक्रिया दरम्यान उमेदवाराच्या प्रतिनिधी जवळ मोबाईल आढळला तर कडक कारवाई होणार

हिंगोली चे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची माहिती

मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात नागरिकांना गर्दी करता येणार नाही

हिंगोलीत निवडणूक निकालानंतर मिरवणुकीला परवानगी नाही

हिंगोलीत कलम 163 लागू असल्याने नागरिकांनी नोंद घ्यावी अन्यथा कारवाई होणार

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live Update अहिल्यानगर जिल्ह्यात पालिका निवडणुकांच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

अहिल्यानगर जिल्ह्यात 12 पालीकांसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.. प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.. जिल्ह्यात विखे, थोरात, काळे, कोल्हे, तनपुरे, गडाख या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.. सकाळी 10 वाजता वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असून कुणाच्या अंगावर विजयी गुलाल पडतो याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे..

Beed Election Result : : विजय मिरवणुकीवर बीडमध्ये बंदी, पोलिसांचा मोठा निर्णय

बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या निवडणुकांचा आज निकाल लागत आहे यामध्ये बीड गेवराई परळी आंबेजोगाई धारूर माजलगाव या नगर परिषदेचा निकाल लागत असून निकालापूर्वी बीड पोलिसांनी मोठी पावले उचलत विजयी मिरवणुकीवर बंदी घातली असून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवरती हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे त्याचबरोबर निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळेस पोलिसांचा मोठा फौज फाटा असणार आहे यामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि 400 हून अधिक अंमलदार असणार आहेत. आरसीपी, एस आर पी एफ निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवार किंवा पडलेल्या उमेदवारांनी कुठलाही वाद वाद करू नये शांतता राखावी प्रत्येकाने संयमाने आणि जबाबदारीने वागले पाहिजे नसता पोलीस कार्यवाही करतील अशा सक्त सूचना बीड पोलीस यांनी दिल्या आहेत.

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live Update सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणी आज होणार

- जिल्ह्यातील अकरा नगराध्यक्ष आणि 269 नगरसेवक सदस्य आज होणार निश्चित.

- पंढरपूर, मैंदर्गी, दुधनी, अक्कलकोट, बार्शी, कुर्डूवाडी करमाळा, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ नगरपरिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष.

- जिल्ह्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.

- भाजपची जिल्ह्यात मित्र पक्षासह विरोधकांसोबत असणार थेट लढत.

- जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा असणार चोख बंदोबस्त

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live Update वसमत मध्ये मतमोजणी तयारी पूर्ण,15 टेबलवर होणार मतमोजणी

हिंगोलीच्या वसमत नगर परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता मतमोजणीची तयारी देखील पूर्ण करण्यात आली आहे, वसमत शहराच्या जवळ असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्ट्रॉंग रूम उभारण्यात आली असून सकाळी दहा वाजता पंधरा टेबलवर मतमोजणी पार पडणार आहे दरम्यान याचा आढावा घेत निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांच्याशी बातचीत केली आहे

dharashiv Election Result News : धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांसाठी आज मतमोजणी

परंडा येथे शिवसेनेकडून जाकीर सौदागर हे मैदानात आहेत तर त्यांच्या विरोधात स्थानिक आघाडीचे विश्वजीत पाटील हे रिंगणात आहेत, भूम येथे दोन्ही स्थानिक विकास आघाड्यांमध्ये लढत होत आहे. या दोन्ही ठिकाणी राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मोठी ताकद लावली होती, तर त्यांच्या विरोधात अजित पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे, सुजित सिंह ठाकुर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांनी एकत्रित येऊन लढा दिल्याने दोन्ही ठिकाणच्या निवडणुका चुरशीच्या झाल्या होत्या.

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live Update यवतमाळ पालिकेच्या आखाड्यात कोण ठरणार धुरंधर

यवतमाळ नगरपालिकेची मोजणी सकाळी दहा वाजल्यापासून धामणगाव रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सुरू होणार आहे.मतमोजणीच्या 29 फेऱ्या होणार असून या दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live Update विजयी मिरवणुकीला पोलीसांची परवानगी नाही

यवतमाळ जिल्ह्यातील दहा पालिका आणि एका नगरपंचायत साठी काही वेळात मतमोजणीला सुरूवात होणार आहे.या दरम्यान यवतमाळ,पुसद,दारव्हा,उमरखेड येथे अनुचित प्रकार टाळण्याच्या दृष्टीने पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून विजयी उमेदवारांना मिरवणूकीसाठी पोलीसांकडून परवानगी नाकारण्यात येणार आहे.

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live Update रायगडात दहा नगर पालिकांच्या निवडणुकीची आज मतमोजणी

रायगड जिल्ह्यातील दहा नगर पालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.नगराध्यक्ष पदाच्या 10 जागांसाठी 34 उमेदवार रिंगणात आहेत तर नगरसेवक पदाच्या 209 जागांसाठी 575 उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत. तर पेणमध्ये सहा, अलिबाग आणि रोह्यात प्रत्येकी एक अशा आठ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी महायुती मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक महत्वाची आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 live Update : पालिकेवर सत्ता कुणाची? वाचा लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीचा निवडणूक निकाल आज जाहीर होणार आहे. २८८ नगराध्यक्षांची नावं आज निश्चित होणार आहे. महायुती अन् मविआ यांच्यात कोण सरसी मारणार? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात कोण गुलाल उधळणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. राज्यातील क्रमांक एकचा पक्ष नेमका कोणता याचाही फैसला होणार आहे.

राज्यातील २८८ नगरपालिकांसाठी २ टप्प्यात मतदान झालं. २ डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यात तर २० डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले होतं. आज २८८ ठिकाणाचा निकाल जाहीर होणार आहे. आज नगराध्यक्ष कोण होणार? कोणत्या पालिकेवर कुणाची सत्ता येणार? हे स्प्ष्ट होणार आहे.सकाळी १० वाजता राज्यात मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com