MDH and Everest Masala : पॅकबंद मसाल्यांमुळे होऊ शकतो कर्करोग? हाँगकाँग, सिंगापूरमध्ये भारतीय मसाल्यांवरील बंदीनंतर FSSAI ची तपासणी

FSSAI Test MDH Everest Spice : एमडीएच आणि एव्हरेस्ट सारख्या नामांकित चार मसाला उत्पादनांमध्ये इथिनील ऑक्साईड या कीटकनाशकाचे मर्यादेपेक्षा जास्त घटक आढळल्यामुळे यावर हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आलीये.
FSSAI Test MDH Everest Spice
FSSAI Test MDH Everest SpiceSaam tv

Spices Cancer Risk :

एमडीएच आणि एव्हरेस्ट सारख्या नामांकित चार मसाला उत्पादनांमध्ये इथिनील ऑक्साईड या कीटकनाशकाचे मर्यादेपेक्षा जास्त घटक आढळल्यामुळे यावर हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आलीये.

या पार्श्वभूमीवर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI)ने देशात विकल्या जाणाऱ्या मसाल्यांच्या तपासणीचे आदेश जारी केले आहेत. यापूर्वी नेस्टले सारख्या कंपनीच्या बेबी प्रोडक्टमध्ये साखरेचे प्रमाणात जास्त आढळले होते. त्यामुळे बाळाच्या आरोग्यावर (Health) परिणाम होत आहे अशी माहिती पब्लिक आय या स्विस इनव्हेस्टिगेशन ऑर्गनायझेशननं दिली होती.

अशातच सिंगापूर आणि हाँगकाँगमधील या दोन कंपन्यांच्या काही मसाल्यांच्या (Spices) उत्पादनांच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त केली होती. यासाठी FSSAI ने एमडीएच आणि एव्हरेस्टसह सर्व ब्रँडच्या मसाल्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

FSSAI Test MDH Everest Spice
सावधान! चवीचवीने बाळाला Nestle Cerelac खाऊ घालताय? साखरेचं प्रमाण एकदा तपासा

हाँगकाँगच्या सेंटर फॉर फूड सेफ्टी (CFS)ने ग्राहकांना ही उत्पादने खरेदी करु नका आणि व्यापाऱ्यांनी त्याची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तर सिंगापूर फूड एजन्सीने असे मसाले न घेण्याचे निर्देश दिले आहेत.

या उत्पादनांमध्ये एमडीच चा मद्रास करी पावडर, एव्हरेस्ट फिश करी मसाला, एमडीएच चा सांभर मसाला आणि एमडीएचचा करी पावडर मिश्र मसाला यांचा समावेश आहे.

FSSAI Test MDH Everest Spice
Cucumber Side Effects : : रखरखत्या उन्हात काकडीचे अतिप्रमाणात सेवन करताय? आरोग्यावर होणारे दुष्परिणामही जाणून घ्या

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्स, न्यूट्रिशनिस्ट कनिका नारंग म्हणतात. या मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईडचे काही घटक आढळले आहेत. ज्यामुळे कर्करोग (Cancer) होऊ शकतो.

मसाल्यांचा जास्त वापर हा स्वयंपाकघरात अधिक होतो ज्यामुळे ल्युकेमिया, पोटाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच यामुळे जळजळ, श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, अतिसार होऊ शकतो असे मत डॉक्टरांनी नोंदवले आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरने मसल्यांवर केलेला दावा किती खरा आहे FSSAI च्या चाचणीनंतर कळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com