सावधान! चवीचवीने बाळाला Nestle Cerelac खाऊ घालताय? साखरेचं प्रमाण एकदा तपासा

Nestle Cerelac : लहान मुलांची वाढ चांगल्याप्रकारे व्हावी यासाठी अनेक कंपन्या त्यांच्यासाठी खाण्याचे प्रोडक्ट बनवतात. त्यातील एक नेस्ले. जर तुम्ही देखील तुमच्या मुलांना फूड सप्लिमेंट म्हणून सेरेलॅक खाऊ घालत असाल तर ही बातमी आधी वाचा
Nestle Cerelac
Nestle Cerelac Saam tv

Nestle Product :

लहान मुलांची वाढ चांगल्याप्रकारे व्हावी यासाठी अनेक कंपन्या त्यांच्यासाठी खाण्याचे प्रोडक्ट बनवतात. त्यातील एक नेस्ले. जर तुम्ही देखील तुमच्या मुलांना फूड सप्लिमेंट म्हणून सेरेलॅक खाऊ घालत असाल तर ही बातमी आधी वाचा.

जगातील सर्वात मोठी एफएमसी आणि बेबी फॉर्म्युला मॅन्युफॅक्चर नेस्ले भारत आणि आशियाई देश आणि आफ्रिकन देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या बेबी (Baby) मिल्क आणि फूड (Food) सप्लिमेंट सेरेलॅकमध्ये साखर मिसळत असल्याची माहिती समोर आली आहे.

पब्लिक आय या स्विस इनव्हेस्टिगेशन ऑर्गनायझेशननं सादर केलेल्या रिपोर्टमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार नेस्लेच्या निडो आणि सेरेलॅकमध्ये सुक्रोज किंवा मधाच्या स्वरुपात साखरेचं (Sugar) प्रमाण आढळले आहे. निडो हे एक वर्ष आणि त्याहून लहान मुलांच्या दुधात वापरला जाणारा पदार्थ आहे. तर सेरेलॅक सहा महिने ते दोन वर्षातील मुलांना खाऊ घातले जाते.

Nestle Cerelac
Kids Memory Power : उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांची बुद्धी तल्लख करायचीये? जीवनशैलीत करा हे बदल

आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या बेबी फूड प्रोडक्ट तपासणी करण्यासाठी बेल्जियमच्या लॅबमध्ये पाठवले तेव्हा धक्कादायक ही माहिती समोर आली.

मिळालेल्या रिपोर्टमधून असे देखील कळले आहे की, भारतात २०२२ मध्ये याची विक्री २५० मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. सेरेलॅक बेबीच्या सर्व्हिंगमध्ये ३ ग्रॅमपेक्षा जास्त साखर आहे. हीच परिस्थिती दक्षिण अफ्रिकेत देखील आहे.

Nestle Cerelac
Baby Care Tips : ४ महिन्यांच्या बाळाला सॉलिड डाएट देऊ शकतो का? जाणून घ्या डॉक्टरांकडून

ब्राझिलमध्ये तीन ग्रॅमपेक्षा जास्त सेरेलॅक बेबी फूडमध्ये सरासरी साखरेचे प्रमाण ३ ग्रॅम पेक्षा जास्त आहे. नेस्लेने जर्मनी, फ्रान्स आणि यूकेमध्ये विकल्या गेलेल्या सेरेलॅकमध्ये भेसळ नसल्याचे आढळून आले मात्र इतर देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या या उत्पादनात अतिरिक्त साखरेची भेसळ झालेली पाहायला मिळाली आहे.

WHO ने याविषयी नेस्लेला चेतावणी दिली आहे. बाळाला यातून मिळणाऱ्या साखरेमुळे लठ्ठपणा आणि इतर आजारांचा धोका वाढू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com