Baby Care Tips
Baby Care TipsSaam Tv

Baby Care Tips : ४ महिन्यांच्या बाळाला सॉलिड डाएट देऊ शकतो का? जाणून घ्या डॉक्टरांकडून

Can Solid Diet Be Given To 4 Month Old baby : बाळ जन्माला आल्यानंतर त्याला सगळ्यात आधी आईचे दुध पाजले जाते. किमान ६ महिने तरी बाळाला आईचे दुध पाजण्याचा सल्ला डॉक्टर देतात. हल्ली कामाच्या व्यापामुळे नवीन झालेल्या मातांना बाळाला पुरेसा वेळ देता येत नाही.

Parenting Tips :

बाळ जन्माला आल्यानंतर त्याला सगळ्यात आधी आईचे दुध पाजले जाते. किमान ६ महिने तरी बाळाला आईचे दुध पाजण्याचा सल्ला डॉक्टर देतात. हल्ली कामाच्या व्यापामुळे नवीन झालेल्या मातांना बाळाला पुरेसा वेळ देता येत नाही.

बाळाच्या वयानुसार आणि गरजेनुसार त्याला योग्य आणि पुरेशा प्रमाणात पोषक तत्व मिळणे गरजेचे आहे. बाळांने (Baby) सहा महिने ओलांडल्यानंतर त्याला गरजेनुसार आहार दिला जातो. बाळाला आईच्या दुधापासून लांब ठेवण्यासाठी घन आहार (Food) सुरु करतात.

ज्यामध्ये भाज्या, फळांची प्युरी मुलांना दिली जाते किंवा कडधान्ये आणि चपातीचे मिश्रण खाऊ घातले जाते. परंतु, मुलांना सॉलिड डाएट (Diet) खाऊ घालण्याचे योग्य वय कोणते? बाळ ४ महिन्यांचे झाल्यानंतर त्यांना कोणता आहार द्यावा जाणून घेऊया डॉक्टरांकडून

Baby Care Tips
Summer Travel Plan : उन्हाळ्यात फिरण्याचा प्लान करताय? ही ८ पर्यटनस्थळे आहेत बेस्ट!

1. डॉक्टर काय म्हणतात?

डॉक्टरांच्या मते, मुले तोंडात हात घालू लागल्यावर पालक त्यांना ठोस आहार देण्यास सुरुवात करतात. पण असे करणे योग्य नाही. ४ महिन्यांच्या बाळाच्या आतड्यांमध्ये अन्न पचवण्यासाठी एंजाइम नसते. त्यामुळे बाळांच्या आतड्यावर परिणाम होऊ नये यासाठी ६ महिने बाळाला आईचे दूध पाजावे. असे केल्याने मुलांची प्रतिकारशक्ती सुधारते.

Baby Care Tips
Study Time : मुलांनो, अभ्यास करण्याची ही असते योग्य वेळ? या वेळी अभ्यास केल्यास कधीच येत नाही अपयश

WHO च्या मते ६ महिन्यांपर्यंत बाळाला आईचे दूध द्यावे. ६ महिने पूर्ण झाल्यानंतर घन आहार सुरु करावा. तसेच बाळाला २ वर्षापर्यंत आईचे दूध पाजावे. ज्यामुळे मुलांच्या विकासात वाढ होईल. मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल. तसेच बाळ इतर आजारांपासून दूर राहिल.

2. ६ महिन्यांच्या बाळाला काय खाऊ घालावे?

६ महिन्यांच्या बाळाला घरचे पदार्थ खाऊ घाला. जे पचायला हलके असतात. त्या पदार्थांचा कोणत्याही प्रकारची चव नसायला हवी. बाळाला कमी गोडाचे पदार्थ खाऊ घाला. साल काढलेली मुगाची डाळ किंवा तांदळाची पेच खाऊ घालू शकता. शिजवलेले गाजर, रताळे, बटाटा देखील खायला घालू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com