कोमल दामुद्रे
उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकांना फिरायला जायचे असते. मुलांना सुट्टी लागल्यामुळे पालक देखील फिरण्याचा प्लान करतात.
जर तुम्ही देखील मुंबई, गोवा, मनाली, महाबळेश्वरसारख्या पर्यटनस्थळांना भेट देऊन कंटाळले असाल तर भारतातील या पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या
जर तुम्हाला निर्सगाची आवड असेल तर तुम्ही उन्हाळ्यात तवांग फिरण्याचा प्लान करु शकता.
उटीचे मनोहरी सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालण्याचे काम करते. निलगिरी पर्वतरांगात वसलेलं थंड हवेचं ठिकाण आहे.
शिमलामधील सतलज घाटीमध्ये वसलेलं सरहान सुंदर पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी सफरचंदाच्या बागा, देवदाराची जंगल, लहान लहान नद्या पाहायला मिळतात.
भारतातील सुंदर ठिकाणांपैकी एक अर्थात शिलाँग. जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारं चेरापुंजी-मौसीनराम ठिकाण आहे.
केरळमधलं मनमोहक स्थळ. याची ओळख केरळचा स्वर्ग म्हणून अशी आहे. पश्चिम घाटाचं विहंगम सौंदर्य पांघरुन वायनाड हे स्थळ दूरदूरच्या पर्यटकांना आकर्षित करतं.