Pickle Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Pickle Recipe : तेल न वापरता बनवा लिंबूचं लोणचं; चटकदार रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

Without Oil Made Pickle Recipe : आम्ही तुमच्यासाठी शेफ पंकज भदौरिया यांची तेल न वापरता बनवलेल्या एका लोणच्याची खास रेसिपी आणली आहे.

Ruchika Jadhav

जेवणात फक्त डाळ आणि भात असेल तर त्यासोबत लोणचं चाखायला सर्वांनाच आवडतं. लोणचं बनवताना त्यात भरपूर तेल टाकलं जातं. मात्र काही व्यक्ती डाएट करतात किंवा त्यांना काही समस्या असल्याने तेलकट लोणचे खात नाहीत. आता तुम्हाला देखील अशा काही समस्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी शेफ पंकज भदौरिया यांनी तेल न वापरता बनवलेल्या एका लोणच्याची खास रेसिपी आणली आहे.

साहित्य

लिंबू

बडिशेप

मेथी दाणे

ओवा

काळी मिरी पावडर

साधं मीठ

काळं मीठ

कश्मिरी लाल तिखट

हिंग

कृती

सर्वात आधी लिंबूचे लोणचे बनवताना लिंबू २ दिवस आधी पाण्यात भिजत ठेवा. लिंबाची साल कडवट असते, हा कडवटपणा निघूनजावा यासाठी लिंबू २ दिवस पाण्यात भिजवणे आवश्यक आहे. पुढे मसाल्याची तयारी करा. यासाठी बडिशेप आणि मेथी दाणे एका पॅनमध्ये फक्त भाजून घ्या. हे भाजत असताना त्यात ओवा काळी मिरी पावडर,साधं मीठ, काळं मीठ, कश्मिरी लाल तिखट आणि हिंग एकत्र मिक्स करा. तसेच हे छान भाजून घ्या.

तर दुसरीकडे तुम्ही दोन दिवस भिजवलेले लिंबू एका कुकरमध्ये थोडं मीठ मिक्स करून शिजवून घ्या. शिजलेले लिंबू कुकरमधून बाहेर काढा. तसेच ते पूर्ण थंड होऊ द्या. लिंबू थंड झाल्यानंतर त्याचे सरळ दोन काप करून घ्या. दोन काप झाल्यावर पुन्हा दुसऱ्या एका कुकरमध्ये लिंबू घ्या. लिंबू कुकरमध्ये घेतल्यावर त्यावर आपण तयार केलेला मसाला मिक्स करा. तसेच यात अगदी 1/4 कप पाणी मिक्स करा आणि एक मोठा चमचा साखर मिक्स करा.

पुढे कुकरला शिट्टी न लावता वरच्यावर लिंबूचं लोणचं तयार होऊ द्या. लिंबूला सर्व मसाले व्यवस्थित लागले पाहिजेत. मसाले सर्व निट लागल्यानंतरच गॅस बंद करा. आता हे छान थंड होऊ द्या. लिंबूचे लोणचे जास्त वेळ टिकून रहावे यासाठी एक सिंपल ट्रिक वापरली पाहिजे. एका भांड्यात कोळसा छान गरम करून घ्या. आता कोळशावर थोडं हिंग टाका आणि लगेचच एका काचेच्या बाऊलने ते झाकून घ्या. आता तुम्ही ज्या डब्ब्याने किंवा बाऊलने कोळसा झाकला होता त्यामध्येच लोणचं भरून ठेवा. अशा पद्धातीने तुम्ही तेल न वापरता बनवलेलं लोणचं जास्त काळ टिकून राहिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : महापालिकांचा कारभारी कोण? मुंबईत भाजप-ठाकरेंमध्ये काटे की टक्कर, वाचा

Municipal Elections: मतमोजणी सुरु होताच भाजपचे ६ उमेदवार विषयी घोषित; पाहा कुठे लागला निकाल

Gold Price Today: खरेदीची सुवर्णसंधी! सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजचे दर किती?

Todays Horoscope: या राशींच्या गुप्त गोष्टी उघड होऊ शकतात; वाचा आजचं राशीभविष्य

Mumbai Travel: मुंबईतील या 5 ठिकाणांना भेट दिली नाही, म्हणजे मुंबई पाहिलीच नाही

SCROLL FOR NEXT