Rohini Gudaghe
एक किलो करवंद, १०० ग्रॕम मोहरीची डाळ, एक मोठी वाटी साखर, १०० ग्रॕम मीठ, २५ ग्रॕम कच्च्या सोपेची पूड, १०० ग्रॕम सुहाना लोणचे मसाला, २०० ग्रॕम तेल, दहा ते पंधरा लसूण पाकळ्या
करवंद बत्त्याने ठेचा किंवा हाताने तुकडे करा.
त्यात मीठ, साखर घालून दोन दिवस ठेवा.
आता कढईत तेल गरम करा.
लसणाच्या पाकळ्या टाकून लाल होऊ द्या. गॅस बंद करा.
मोहरीची डाळ तेलावर भाजून घ्या.
तेल गार झाल्यावर मोहरीची डाळ, सोप पावडर, लोणचे मसाला घाला.
गार झाल्यावर करवंदात ओता. नीट कालवून बरणीत भरा.