नुकताच दिवाळी सण समाप्त झाला आहे आणि डिसेंबर महिना येणार आहे. आता लग्नाचे सिझन सुद्धा येणार आहे. त्यात हिवाळाही सुरू झाला आहे. मग अशा वेळेस लग्नासाठी कोणते आणि कश्यापद्धतीचे कपडे खरेदी करायचे हा प्रश्न महिलांना पडलेला असतो. आता हिवाळा आहे म्हणून संपूर्ण अंग झाकेल अशा पद्धतीचे आणि स्टायलिश कपडे हे कपडे कसे निवडायचे या समस्येचा विचार करून आम्ही तुम्हाला काही खास टिप्स शेअर करणार आहोत.
लेहेंगाच्या आत थर्मल किंवा स्लीव्हलेस लेगिंसचा वापर करा
हिवाळ्यात तुम्ही लग्नाला जाणार असाल तर साडी किंवा लेहेंगा परिधान करू शकता. मात्र त्या आधी लेहेंगाच्या आत थर्मल किंवा स्लीव्हलेस लेगिंसचा वापर करा. त्यामुळे तुमचे शरीर उबदार राहण्यास मदत होईल. त्याचसह थर्मल लेंगिन्स हे हल्के असते आणि याचे कापड शरीराला घट्ट चिकटून राहते.
जॅकेट किंवा शॉल
तुम्ही लेहेंगा परिधान केला असेल असेल जाड ओढणी त्यावर परिधान करू शकता. त्यासह तुम्ही लेहेंगावर फुल हॅड जॅकेट परिधान करू शकता. त्याने तुम्हाला उबदार वाटेल आणि एक हटके स्टाईलिश लुक सुद्धा येईल.
काश्मीरी स्टाईल उबदार शॉल.
लोकरीच्या शॉल्स हा देखील एक उत्तम पर्याय आहे, खासकरून जर तुम्ही जास्त काळ थंडीत बाहेर रहात असाल.तर ही शॉल ही आपण थंडीमध्ये वापरतोच पण हिच शॉल लेहेंगासह तुमचा लुक सुंदर आणि उठावदार करते. शॉल ही एकदम हलकी असते. लग्न समारंभातही तुम्ही सहज शॉल घेवून वावरू शकता.
पार्का जॅकेट
लग्न समारंभ गावच्या ठिकाणी सकाळी किंवा संध्याकाळी असेल तर, तुमचे थंड हवेत येणे होईल यासाठी तुम्ही एक स्टायलिश पार्का जॅकेट परिधान करू शकता. पार्का जॅकेटमध्ये हूडी सुद्धा मिळते त्याने तुमचा थंडीपासून तुमचा बजाव होऊ शकतो.
गरम इनरवेअय
तुम्ही कोणत्याही पद्धतीचे कपडे लग्नासाठी परिधान केले असले तरी त्यात कॉटन उबदार अशा गरम इनरवेअरचा वापर करा. त्यामुळे तुम्ही कंफ्रटेबल राहाल. त्यासाठी तुम्ही थर्मल इनरवेयर सुद्धा परिधान करु शकता. हे तुम्ही लेंहेग्याच्या आत परिधान करू शकता. त्याने थंडीपासून सुद्धा तुमचा बजाव होऊ शकतो.
शुजचा वापर करा
तुम्ही जर थंडी असलेल्या ठिकाणी शुजचा वापर करत असाल हा सगळ्यात भारी उपाय आहे. तुम्ही साडी, लेहेंगा यावर शुज परिधान करू शकता. या कपड्यांमधून तुमचे शुज दिसत नाही आणि तुम्ही कंफर्टेबल चालू शकता. शक्यतो हिवाळ्यात तुम्ही शुजचा वापर करणे आवश्यक आहे. त्याने तुमचे पाय उबदार राहू शकतात.
Edited By: Sakshi Jadhav