नुकताच हिवाळा सुरू झाला आहे. हिवाळा हा ऋतू सगळ्यांच्याच आवडीचा असतो. पावसाळा ऋतू संपला की, लोक हिवाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. याचे एक कारण म्हणजे फिरण्याचे प्लॅन हिवाळ्यात करणे. मुंबई, महाराष्ट्राची राजधानी, भारताचे आर्थिक आणि व्यावसायिक केंद्र आहे. मुंबई ही बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमुळे सुद्धा प्रसिद्ध आहे. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, जुहू बीच, पवई लेक आणि इतर अनेक सुंदर ठिकाणे यांसारखी पर्यटन स्थळे तुम्हाला या शहराच्या जादुई वातावरणाने नक्कीच मंत्रमुग्ध करतील. चला तर जाणून घेवू ठिकाणांची नावे.
येऊर हिल स्टेशन , ठाणे
येऊर हिल स्टेशन मुंबईच्या पूर्वेकडील भागात वसलेले हे आकर्षक ठिकाण आहे. ठाणे हे तलावांचे शहर म्हणूनही ओळखले जाते आणि ते मुंबईपासून जवळ उपलब्ध असलेले पर्यटन स्थळ आहे. प्राचीन मंदिरे आणि किल्ल्यांपासून ते विस्तीर्ण उद्याने आणि टेकड्यांपर्यंत, ठाण्यात प्रत्येकासाठी त्याच्या आवडीची ठिकाणे आहेत. येथे जावून तुम्ही निसर्गाच्या सानिध्याचा अनुभव घेवू शकता. ही ट्रीप तुम्ही एका दिवसात अनुभवू शकता.
उपवन तलाव, ठाणे
आजूबाजूला हिरवेगार आणि निर्मळ तलावाचे पाणी असलेले उपवन तलाव हे शहरातील सर्वात रोमँटिक तलावांपैकी एक म्हणून ओळखले जाते. उपवन तलाव हे येऊर टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेले पर्यावरणपूरक तलाव आहे. हे तलाव त्याच्या मनमोहक सौंदर्यासाठी आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. हे तलाव ठाण्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
द वॉक हिरानंदानी इस्टेट
द वॉक हे भारतातील पहिले हाय स्ट्रीट रेसिडेन्शिअल ठिकाण आहे . या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कॅफे, रेस्टॉरंट्स, सुपरमार्केट आणि जीवनशैलीच्या अनेक सोयींची दुकाने आहेत. तसेच विविध ब्रँड्ससह, ओपन एअर शॉपिंग मॉलचा अनुभव तुम्ही तेथे घेऊ शकता.
गायमुख चौपाटी
घोडबंदर रोड हा ठाण्यातील रहिवाशांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच गायमुख चौपाटी हे प्रमुख आकर्षण आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा हिरवागार परिसर आणि वॉटरफ्रंटने गायमुख खाडीकडे पर्यटकांना नेहमीच आकर्षित केले आहे.
Edited By: Sakshi Jadhav