सॅंडवीच हा आता सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता झाला आहे. बरेच लोक त्यात विशेषत: तरूण मंडळी सॅंडवीच खाणे जास्त पसंत करतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला सॅंडवीच खातात. त्यात अनेक भाज्या असतात त्या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. मात्र हे सॅंडवीच बऱ्याच दा विकत आणून खाल्ले जाते. त्यात तरुण मंडळी कामाच्या वेळेस किंवा कॉलेजच्या वेळेस घरचे खाणे पसंत करत नाहीत. त्यांच्या ही खास सोपी आणि स्ट्रीट स्टाईल मसाला सॅंडवीच रेसिपी आहे. ही तुम्ही घरच्या घरी आणि कमी साहित्यात तयार करू शकता.
स्ट्रीट स्टाईल मसाला सॅंडवीच बनवण्यासाठी साहित्य
ब्रेड-6-8 ब्रेड स्लाइस
बटर किंवा लोणी
हिरवी चटणी (धने, पुदिना, हिरवी मिरची, लसूण, आणि मीठ)
मसाला फिलिंगसाठी साहित्य
3-4 मध्यम बटाटे (उकडलेले आणि मॅश केलेले)
1/2 वाटी कांदा (चिरलेला)
1/2 वाटी टोमॅटो (चिरलेला)
1/2 वाटी शिमला मिरची (चिरलेली)
1/2 वाटी गाजर (किसलेले,)
1/4 टीस्पून हळद
1/2 टीस्पून लाल तिखट
1/2 टीस्पून जिरे
1/2 टीस्पून धनेपूड
1/2 टीस्पून चाट मसाला किंवा गरम मसाला
मीठ चवीनुसार
1-2 टेबलस्पून तेल
सजावटीसाठी:
चीज (ऐच्छिक)
टोमॅटो केचअप
स्ट्रीट स्टाईल मसाला सॅंडवीच बनवण्याची कृती:
मसाला तयार करणे
एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात जिरे टाका. जिरे तडतडल्यावर चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. नंतर टोमॅटो मऊ होईपर्यंत परता. त्यात शिमला मिरची, गाजर, हळद, लाल तिखट, धनेपूड, आणि मीठ . चांगले मिक्स करा. आता मॅश केलेले बटाटे घालून सर्व साहित्य एकत्र करा. चाट मसाला चवीनुसार मिक्स करा. मसाला तयार झाला की बाजूला ठेवा.
सॅंडविच बनवणे
ब्रेड स्लाइसवर हिरवी चटणी लावा. वर दुसरी ब्रेड स्लाइस ठेवा. एका तव्यावर किंवा ग्रिलरमध्ये बटर लावून सॅंडविच दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या. शेवटी गरमागरम मसाला सॅंडविच टोमॅटो केचअप किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. अशाच नवनविन रेसिपीचा आस्वाद घेत राहा.
Edited By: Sakshi Jadhav