लहान मुलांचे संगोपण हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. पालक जेव्हा मुलाला जन्म देतात, तेव्हा पासूनच त्याचे संगोपण करणे सुरु होते. लहान मुलांना प्रत्येक आई-वडील त्यांच्या पद्धतीने चांगल्या वाईट गोष्टी शिकवत असतात. अशात त्यांच्या शारीरिक विकासासोबत मानसिक विकासाचा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत मुलांशी भावनिक आणि मानसिक संबंध निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. अशाच महत्वाच्या गोष्टीवर तज्ञांचा सल्ला देण्यात आला तो पुढील प्रमाणे असेल.
मुलांना या गोष्टी शिकवा
तुमचे मूल पाच वर्षांचे झाल्यावर त्याला जीवनाशी संबंधित काही मूलभूत गोष्टी शिकवल्या पाहिजेत. यामध्ये त्यांना त्यांच्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करण्यासाठी आवश्यक शब्दशैली आणि संवाद कौशल्याची माहिती दिली पाहिजे. यामुळे मुले मानसिकदृष्ट्या मजबूत होतात आणि त्यांच्या भावना सहज व्यक्त करू शकतात.
शारीरिक क्षमतेची माहिती
मुल लहान असताना त्याला त्याच्या शारीरिक क्षमतेची जाणीव नसते. अशा परिस्थितीत, त्यांना अशा गोष्टी सांगितल्या पाहिजेत जेणेकरून त्यांना त्यांच्या शरीराच्या सीमा समजतील. याशिवाय, इतरांचे मान आणि सीमांचा आदर करणे देखील शिकवले पाहिजे.
कसे बोलावे?
मुले लहान असताना त्यांना कधी काय आणि कसे बोलावे हेच कळत नाही. अशा स्थितीत वेगवेगळ्या ठिकाणी वाटाघाटी कशा करायच्या? हे त्यांना सांगितले पाहिजे. त्यांनी काहीही बोलण्याआधी विराम कसा घ्यावा. यामुळे त्यांना विचार करण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळते आणि ते त्यांचे विचार चांगल्या प्रकारे मांडू शकतात.
चुका दाखवून द्या
मूल लहान असताना त्याच्याकडून रोज काही ना काही चूक होत असते. अशा स्थितीत त्याला कधीही खडसावू नये. आपल्या चुकांमधून कसे शिकायचे हे आपण त्यांना समजावून सांगितले पाहिजे. मूल पाच वर्षांचे झाल्यावर हा सराव करणे आवश्यक आहे. यामुळे मुलांची सतत शिकण्याची क्षमता वाढते आणि ते त्यांच्या ध्येयांवर अधिक लक्ष केंद्रित करतात.
मुलांना शेअर करायला शिकवले पाहिजे
मुलं त्यांच्या गोष्टींबद्दल खूप अंतर्मुख असतात. ते त्यांच्या गोष्टी इतरांसोबत शेअर करताना खूप लाजाळू असतात. जेव्हा तुमचे मूल पाच वर्षांचे होईल तेव्हा त्याला शेअरिंगबद्दल नक्कीच शिकवा. याशिवाय त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी कसे काम करावे लागेल हे देखील सांगा. त्यामुळे मुले जागरूक होऊन त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घेतात. या गोष्टींमुळे मुलेही हुशार बनतात आणि त्यांना गोष्टी लवकर समजू लागतात.
Edited By: Sakshi Jadhav