Solkadhi Recipe: सोलकढी कशी बनवावी? संपूर्ण रेसिपी सोबत फायदे आणि टिप्स

solkadhi quick recipe marathi: . सोलकढी चवीला उत्तम असतेच त्यासह आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असते.
solkadhi quick recipe marathi:सोलकढी कशी बनवावी संपूर्ण रेसिपी सोबत फायदे आणि टिप्स
Solkadhi Recipegoogle
Published On

फार पुर्वीपासूनचे लोक अजुनही तितक्याच आवडीने सोलकढीवर ताव मारतात. कोकणात तर सोलकढी शिवाय जेवण पुर्ण झाल्यासारखे वाटतचं नाही. सोलकढी चवीला उत्तम असतेच त्यासह आरोग्यासाठी सुद्धा सोलकढी खूप फायदेशीर असते. कोकम पचनसंस्थेसाठी फायदेशीर असतं. हे अन्न पचवायला मदत करतं आणि अपचन होत नाही.

तसेच सोलकढी शरीरातील ऍसिडिटी कमी करून गॅसवर मात करते. तर नारळाचं दूध शरीराला थंडावा देते. कोकम आणि नारळाचं दूध दोन्ही आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. कोकममध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी सोलकढी मदत करते. नारळाच्या दुधामध्ये कॅल्शियम आणि फायबर असतं, जे हाडं आणि पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे.

solkadhi quick recipe marathi:सोलकढी कशी बनवावी संपूर्ण रेसिपी सोबत फायदे आणि टिप्स
Swapna Shastra: स्वप्नामुळे बदलतं नशीब, 'या' गोष्टी दिसल्या तर चमकेल तुमचं भाग्य

साहित्य:

कोकम: 8-10 कळ्या

नारळाचं दूध: 1 कप (ताजं असल्यास उत्तम)

लसूण: 3-4 पाकळ्या

हिरवी मिरची: 1-2

जिरे: 1/2 चमचा

कोथिंबीर: बारीक चिरलेली

गूळ: 1-2 चमचे (ऐच्छिक)

मीठ: चवीनुसार

पाणी: 1 कप

कृती

कोकम भिजवणे

कोकमाच्या कळ्या एका भांड्यात 1 कप कोमट पाण्यात 15-20 मिनिटं भिजत ठेवा. पाणी गुलाबीसर रंगाचं आणि आंबट होईपर्यंत भिजवून ठेवा.

पेस्ट तयार करणे

लसूण, जिरे आणि हिरवी मिरची एकत्र वाटून बारीक पेस्ट तयार करा.

मिश्रण तयार करणे

भिजवलेल्या कोकमाचं पाणी गाळून घ्या. त्यात नारळाचं दूध मिसळा.

चवीनुसार मसाले मिक्स करणे

नारळाचे दूध, कोकमाचे पाणी, लसणाची पेस्ट, गुळ (ऐच्छिक), आणि मीठ घालून चांगलं ढवळा.

सजावट आणि सर्व्ह करणे

वरून कोथिंबीर घाला. थंड करून किंवा गारसर अवस्थेत भाताबरोबर किंवा पेय म्हणून सर्व्ह करा.

टीप

1.गुळ न घालता सोलकढी अधिक पारंपरिक लागते.

2. ताजी नारळाचे दुध वापरल्यास सोलकढीला उत्तम चव येते.

3. अशी बनवलेली सोलकढी अतिशय चवदार आणि आरोग्यदायी असते.

4. सोलकढी ही केवळ चविष्ट पेय नसून आरोग्यदायी देखील आहे. त्यामुळे ती नियमित आहारात सामाविष्ट करा.

Written By: Sakshi Jadhav

solkadhi quick recipe marathi:सोलकढी कशी बनवावी संपूर्ण रेसिपी सोबत फायदे आणि टिप्स
Health Tips: हिवाळ्यात भाजलेले हरभरे खा; 'हे' आजार राहतील कोसो दूर

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com