Satbara  Saam Tv
लाईफस्टाईल

Satbara : 'सातबारा उतारा' असं का म्हणतात? हा शब्द आला कुठून?

Satbara Meaning : सध्याच्या दिवसात एखादी जमीन खरेदी करायची असल्यास जमिनीचा इतिहास माहीत असणे प्रत्येकाला गरजेचे आहे. खरेदीपूर्वी जमीन मूळ कोणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल झाले याची योग्य माहिती असावी लागते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैष्णवी राऊत, साम टीव्ही

जमीन म्हटलं की सातबारा आलाच. मग ती जमीन खरेदी करायची असो की विकायची असो. शेतजमीन असो की बिगर शेती जमीन... सातबारा हा लागतोच. पण याला सातबारा उताराच का म्हणतात? हा शब्द आला कुठून? असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का?

एखादी जमीन खरेदी किंवा विक्री करायची असेल तर त्या जमिनीचा इतिहास माहीत असावा लागतो. ही मूळ कोणाची होती? त्यात वेळोवेळी काय बदल झाले? आता ही जमीन कुणाच्या मालकीची आहे? किती जमीन आहे? असा सगळा लेखाजोखा आपल्याकडे असणं आवश्यक असतं. ही सर्व माहिती मिळवण्यासाठी सातबाऱ्याची गरज पडते.

सातबारा उतारा हा एक सरकारी दस्तऐवज आहे. यावर वंशपरंपरेने आलेली जमीन (land)असो किंवा स्वतः कष्ट करून खरेदी केलेली जमीन असो, सगळ्याची रितसर नोंद केलेली असते. जमिनीचे व्यवहार करताना याच कागदावर सर्व विश्वास ठेवतात. कारण आपल्या जमिनीवर आपला हक्क सांगणारा हा सरकारी कागद असतो.

इतका महत्त्वाचा कागद(Paper) असतो, तर त्याचा उगम, म्हणजे त्याचं नाव कसं पडलं? हे माहित असायलाच हवं. काहींना वाटत असेल की सातबारा हे जमिनीशी संबंधित कुठल्यातरी कायद्याचं कलम असेल. पण नाही, हे असं नाही आहे.

'सातबारा' हे नाव अहिल्याबाई होळकरांची देण आहे, त्यांचं योगदान आहे. अहिल्यादेवी होळकरांनी सरकारी खर्चाने त्यांच्या गरीब प्रजेला १२ फळझाड अंगणात लावायला दिलेली. त्यातील ७ झाडं त्या गरीबाची आणि ५ झाडं सरकारची. प्रजेनं सगळ्या १२ झाडांची निगा राखायची. या १२ पैकी ७ झाडांची फळं स्वत: खायची आणि उरलेल्या ५ झाडांची फळं सरकार दरबारी जमा करायची.

अशाप्रकारे १२ पैकी ७ फळं(fruits) प्रजेच्या मालकीची असल्याने त्याला 'सातबारा' म्हटलं जाऊ लागलं. या सर्व झाडांची नोंद ठेवण्यासाठी एक सरकारी दफ्तर निर्माण करण्यात आलं. या नोंदीच्या उताऱ्यालाच 'सातबारा उतारा' म्हणायला लागले आणि ते आजतागायत कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2025 Raksha Bandhan: 9 ऑगस्ट रक्षाबंधनच्या ओवाळणीचा शुभ मुहूर्त काय? वेळ, महत्व आणि खास मंत्र घ्या जाणून

FIR Against Marathi Actress: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीविरोधात पोलिसांत गुन्हा; जातीय द्वेष पसरवल्याचा आरोप, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Maharashtra Live News Update : - इगतपुरीजवळ कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनला लागली आग

Prajwal Revanna : ४७ वर्षीय मोलकरणीवर बलात्कार, माजी खासदाराला जन्मठेप; काय आहे प्रकरण?

तुम्ही अर्बन नक्षलसारखं वागाल तर अटक होईल; CM फडणवीसांचं राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर | VIDEO

SCROLL FOR NEXT