Sarees Store Tips: महागड्या साड्यांची वर्षानुवर्षे निगा राखायचीये? तर कपाटात ठेवण्यापूर्वी या 5 गोष्टी लक्षात ठेवा

Sakshi Sunil Jadhav

साड्यांची आवड

भारतात महिलांना महागड्या साड्या नेसायला खूप आवडतात. त्या महिला नुसत्या साड्या विकत घेत नाहीत. तर वर्षानुवर्षे त्या जपून ठेवतात.

expensive saree care tips

महिलांच्या समस्या

बऱ्याचदा महिला सिल्क, बनारसी, कांजीवरम किंवा जरीच्या महागड्या साड्या विकत घेतात. पण त्यांना त्या जपून किंवा कपाटात साठवण्यापुर्वी काय काळजी घेतली पाहिजे? हे माहित नसतं.

how to store silk sarees

पहिली टीप

कार्यक्रमावरून आल्यावर साडी थेट फोल्ड करून ठेवू नका. आधी 2–3 तास हवेत टांगून ठेवा, जेणेकरून घाम, परफ्यूम आणि ओलसरपणा निघून जाईल.

how to store silk sarees

दुसरी टीप

हलका डाग असला तरी दुर्लक्ष करू नका. लगेच स्वच्छ करून घ्या, अन्यथा डाग पक्के बसतात.

how to store silk sarees

तिसरी टीप

जड सिल्क किंवा जरीच्या साड्या घरी धुण्याऐवजी ड्राय क्लीन करणे योग्य. त्यामुळे कापडाची चमक आणि गुणवत्ता टिकून राहते.

how to store silk sarees

चौथी टीप

साडी नेहमी कॉटन किंवा मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवा. यामुळे फॅब्रिक चांगलं टिकून राहते.

how to store silk sarees

पाचवी टीप

प्लास्टिक कव्हरमध्ये साडी ठेवल्याने ओलावा अडकतो आणि कापड खराब होऊ शकते.

saree cleaning tips

सहावी टीप

दर 3 ते 4 महिन्यांनी साडीची घडी बदला. एकाच जागी वारंवार घडी राहिल्याने कापड कमकुवत होते.

saree cleaning tips

सातवी टीप

कपाटात सिलिका जेल पॅकेट, नीमाची पाने किंवा लवंग ठेवा. यामुळे ओलावा आणि किडींपासून संरक्षण मिळते.

saree cleaning tips

NEXT: Lapwing Bird: झाडावर न बसणाऱ्या टिटव्या कुठे राहतात अन् काय खातात? जाणून घ्या सत्य

lapwing eggs protection
येथे क्लिक करा