

सोलापुरात नवरा-बायकोने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली
सुसाईड नोटमध्ये एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या त्रासाचा उल्लेख करण्यात आला
संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले
सोलापूरमध्ये नवरा-बायकोने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एकतर्फी प्रेमातून बायकोला होणाऱ्या त्रासाला कंटाळून नवरा-बायकोने आत्महत्या केली. या नवरा-बायकोने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमधून आत्महत्या करण्यामागचे हे धक्कादायक कारण समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील नवरा-बायकोच्या आत्महत्येमागचं कारण समोर आलं आहे. विष प्रशान करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत विजयपूर येथील व्यक्तीचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून बायकोला त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून दाम्पत्याने विष पिऊन आत्महत्या केली होती. सोमनाथ धानोप्पा पाटील तर श्रीदेवी सोमनाथ पाटील असं आत्महत्या केलेल्या नवरा- बायकोची नावं होती.
विजयपूर येथील अभिषेक कोरे असं सोमनाथ यांच्या बायकोला त्रास देणाऱ्या संशयित व्यक्तीचे नाव होते. एमआयडीसी पोलिसांनी अभिषेक कोरेला ताब्यात घेतलं. अभिषेक कोरे हा एकतर्फी प्रेमातून सोमनाथ यांच्या बायकोला वारंवार त्रास देत होता. त्यातूनच बदनामी करण्याची धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून दोघांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली.
सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील यांना दोन मुले आहेत. त्यांचा किराणाचा व्यवसाय होता. सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या तोंडातून फेस असल्याने मुलींनी काका नवनाथ पाटील यांना सांगितलं होतं. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.