पुण्यातील आयटी तरुणाने लोणावळ्यात टायगर पॉइंटवरून उडी
आत्महत्येपूर्वी पत्नीला भावनिक संदेश
सहकाऱ्यांच्या मानसिक छळाचा संशय
फॉरेन्सी टीमकडून घटनास्थळी तपास सुरू
बचाव पथकाच्या मदतीने दरीतून मृतदेह बाहेर काढला
लोणावळ्यात दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एका आयटी तरुणाने केलेल्या आत्महत्येबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातील बाणेर येथील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या वीरेंद्र वाल्मीकी सिन्हा (वय 33) या तरुणाने सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.आज फॉरेन्सी टीम लोणावळ्यातील टायगर पॉइंट वर येऊन चौकशी केली.
वीरेंद्र सिन्हा हे मूळचे नागपूर जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मनकापूर येथील रहिवासी होते. ते बाणेर येथील एका आयटी कंपनीत नोकरी करत होते. त्यांचा वाढदिवस असल्याने बुधवारी त्यांनी पुण्यातील आपले नातेवाईक व मित्रांसोबत केक कापून साजरा केला होता. त्यानंतर ते लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे गेले होते.
गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी आपल्या मोबाईलवरून पत्नी रिया सिन्हा यांना संदेश पाठवला. त्यामध्ये, “आय लव you रिया… कुठल्या तरी जन्मात पुन्हा भेटू. माझी गाडी लोणावळ्यात टायगर पॉइंट येथे आहे. गाडीची चावी पुढील टायरखाली आहे व मोबाईल समोरील कॅबिनेटमध्ये आहे,” असा उल्लेख होता. हा संदेश पाहून रिया यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शिवदुर्ग मित्र बचाव पथकाच्या मदतीने मोठ्या शोध मोहिमेनंतर वीरेंद्र सिन्हा यांचा मृतदेह दरीत सापडला. ही शोधमोहीम सायंकाळी साडेचारच्या सुमारास यशस्वी झाली. सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. आज फॉरेन्सी टीम लोणावळ्यातील टायगर पॉइंट वर येऊन चौकशी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.