ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे अनेकांचे वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे अनेकजण लठ्ठपणाचे शिकार होतात.
आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश न केल्यामुळे बारीक होण्याच्या समस्येचा सामनाही अनेकांना करावा लागतो. या फळांचे सेवन केल्यास तुम्ही जाड होऊ शकता.
केळी हा कार्बोहायड्रेटचा चांगला स्रोत मानला जातो. केळीच्या नियमित सेवनाने वजन वाढते.
अननसात पुरेशा प्रमाणात साखर असते. हेल्दी वजन वाढवण्यासाठी ते दररोज मर्यादित प्रमाणात खावे.
आंब्यात असलेली साखर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
एवोकॅडोमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. तब्येतीने बारीक असलेले लोक वजन वाढवण्यासाठी हे खाऊ शकतात.
द्राक्षांमध्ये कार्बोहायड्रेट चांगल्या प्रमाणात आढळते, तज्ञांच्या मते, हेल्दी वजन वाढवण्यासाठी द्राक्षे खाल्ली पाहिजेत.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.