Gujiya Recipe: रंगपंचमी स्पेशल गुजिया कशी करायची? वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

2 कप मैदा4 टेबलस्पून तूपचिमूटभर मीठपाणी(मळण्यासाठी)1 कप खवा (मावा)½ कप पिठीसाखर2 टेबलस्पून सुका मेवा (बदाम, काजू)2 टेबलस्पून किसलेले सुके खोबरे कणीक मळण्याची पद्धत

Gujiya Recipe | Saam Tv

कणीक मळण्याची पद्धत

मैद्यात तूप आणि मीठ घालून हाताने चोळा. नंतर थोडे थोडे पाणी घालून घट्ट कणीक मळा. ओल्या कापडाने झाकून 15–20 मिनिटे बाजूला ठेवा.

Gujiya Recipe | Saam Tv

सारण तयार करण्याची कृती

कढईत खवा हलका गुलाबी होईपर्यंत भाजा. थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, सुका मेवा, खोबरे आणि वेलची पूड मिसळा. तयार सारण बाजूला ठेवा.

Gujiya Recipe | Saam Tv

गुजिया आकार देण्याची पद्धत

कणकेचे छोटे गोळे करून पुरी लाटा. मध्ये 1–2 चमचे सारण ठेवा. अर्धचंद्राकृती दुमडून कडा नीट दाबून बंद करा. सजावटीसाठी कडा पिळून डिझाईन करू शकता.

Gujiya Recipe | Saam Tv

तळण्याची प्रक्रिया

कढईत तेल किंवा तूप गरम करा. मध्यम आचेवर गुजिया सोनेरी रंग येईपर्यंत तळा. जास्त आच टाळा, नाहीतर गुजिया फुटू शकतात.

Gujiya Recipe | Saam Tv

साठवण कशी करावी?

तळलेली गुजिया पूर्ण थंड झाल्यावर एअरटाइट डब्यात ठेवा. 7–10 दिवस सहज टिकतात.

Gujiya Recipe | Saam Tv

गुजियाचे फायदे

सणासुदीचा पारंपरिक गोड पदार्थ. खवा आणि सुका मेव्यामुळे ऊर्जा वाढते. होळी, दिवाळी किंवा खास प्रसंगी उत्तम पर्याय

Gujiya Recipe | Saam Tv

Cheese Garlic Bread Recipe: रविवारी लहान मुलांसाठी बनवा चीज गार्लिक ब्रेड, वाचा सोपी रेसिपी

Cheese Garlic Bread Recipe | Saam TV
येथे क्लिक करा