Sweating In Winter Saam Tv
लाईफस्टाईल

हिवाळ्यात घाम का येतो? शरीराच्या महत्वाच्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Sweating In Winter: हिवाळ्यात घाम का येतो? यामागील नेमकं कारण काय असू शकते ते जाणून घ्या.

Manasvi Choudhary

हिवाळ्यात वातावरणात गारवा असतो अशावेळी जर तुम्हाला घाम येत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. हिवाळ्यात घाम येणे हे तुमच्या शरीरातील समस्याचे लक्षण असू शकते. हिवाळ्यात शरीरातून घाम येणे हे चिंता, तणाव आणि मायग्रेन यासारख्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.

वैद्यकीय माहितीनुसार, घाम येणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे ज्याद्वारे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. साधारण उन्हाळ्यात शरीरातून घाम येणे असा संबंध लावला जातो परंतु हिवाळ्यातही शरीरातून घाम येत राहतो. शरीरातील तापमान आणि अवयवाच्या कार्यप्रणालीसाठी शरीराचे तापमान योग्य असणे महत्वाचे आहे.

जेव्हा शरीर जास्त गरम होते तेव्हा घाम ग्रंथी त्वचेवर ओलावा सोडतात. घाम सुकल्यार शरीर थंड करण्यास मदत करते. ही प्रक्रिया कोणत्याही ऋतूमध्ये होते. वर्षभर सुरू राहते.

खुप जास्त कपडे घालणे

हिवाळ्यात घाम येण्याच्या सर्वात सामान्य कारण म्हणजे खूप जास्त कपडे घालणे. स्वेटर, जॅकेट आणि इतर जाड कपड्यांमुळे उष्णता रोखली जाते त्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि घाम येतो.

शारीरिक हालचालीमुळे

वातावरण थंड असले तरी जिने चढ-उतार करणे, व्यायाम करणे, डान्स करणे यासारंख्या शारीरिक हालचालीमुळे देखील शरीराचे तापमान वाढू शकते.

तणाव

सतत तणाव आणि चिंता केल्याने हिवाळ्यातही घाम येऊ शकतो. जेव्हा शरीरावर ताण येतो तेव्हा कार्टिसोलची पातळी वाढते आणि शरीरातील उष्णता वाढते ज्यामुळे हिवाळ्यातही घाम येऊ शकतो.

मसालेदार पदार्थ आणि कॉफी टाळा

मसालेदार पदार्थ खाल्ल्याने तसेच कॉफीचे सेवन केल्याने हिवाळ्यात जास्त घाम येऊ शकतो. हे पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि घाम येतो.

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे बदलापुरात दाखल

IND vs NZ 2nd Test: टीम इंडिया बॅकफूटवर! राहुल, गिल, पंतचा फ्लॉप शो; 116 रन्सवर 6 गडी तंबूत, 240 धावांनी पिछाडीवर

Ashok Choudhary : मोठी बातमी! मंत्री अशोक चौधरींचा राजीनामा, का सोडलं प्राध्यापक पद?

महिलांसाठी खुशखबर! 'या' योजनेसाठी १४ कोटींचा निधी मंजूर; खात्यात ४ दिवसात ₹३००० येणार

Delimitation Bill : ‘शरद पवारांच्या सहकाऱ्यांनी माती खाल्ली’; संजय राऊत राष्ट्रवादीच्या खासदारांवर कडाडले, भाजपवरही निशाणा

SCROLL FOR NEXT