महिलांसाठी खुशखबर! 'या' योजनेसाठी १४ कोटींचा निधी मंजूर; खात्यात ४ दिवसात ₹३००० येणार

Maharashtra Government Scheme : महिलांसाठी महाराष्ट्रात १४.१२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तसेच हप्त्याच्या तारखेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Matru Vandana Yojana
Matru Vandana Yojanasaam tv
Published On: 

महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत (PMMVY) आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी महाराष्ट्रातल्या अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी निधी वितरित करायला राज्य सरकारने मंजुरी दिली. यासाठी एकूण १४ कोटी १२ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र महिलांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

महिलांना मिळणार मातृवंदना योजनेचा हप्ता?

प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही महिला व बालविकास विभागामार्फत राबवली जाते. गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना आर्थिक मदत देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. महिलांना गर्भधारेदरम्यान गरजेच्या पोषण आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी आर्थिक आधार मिळावा, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.

Matru Vandana Yojana
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार? ८व्या वेतन आयोगाबाबत आली मोठी अपडेट

राज्य शासनाच्या निर्णयानुसार, आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी या योजनेच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी निधी वितरित केला जाणार आहे. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होण्याबाबत अपेक्षा वाढल्या.

Matru Vandana Yojana
RBI New ATM Rules: RBI कडून ATM आणि कार्ड पेमेंटच्या नियमात बदल; नवा चार्ज किती आणि तुमच्यावर काय परिणाम?

किती निधी मंजूर करण्यात आला?

राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी एकूण १४,१२,४४,५०० रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारचा निधीवाटपाचा हिस्सा ६०:४० असा आहे. म्हणजेच ६० टक्के निधी केंद्र सरकारकडून, तर ४० टक्के निधी राज्य सरकारकडून दिला जातो.

महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार?

मंजूर निधीचे वितरण आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्याकडे एकल समन्वय यंत्रणा (SNA SPARSH) म्हणून करण्यात येणार आहे. त्यानंतर निधीचा वापर आणि वितरण नियमानुसार केले जाईल. पण शासन निर्णयात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची निश्चित तारीख नमूद केलेली नाही. त्यामुळे पात्र महिलांनी आपली नोंदणी, बँक खाते आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती अपडेट ठेवावी.

योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना शासनाच्या नियमांनुसार आर्थिक मदत दिली जाते. लाभ मिळण्यासाठी योजनेच्या पात्रता अटी पूर्ण करणे आणि आवश्यक नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पात्र महिलांनी महिला व बालविकास विभाग किंवा अंगणवाडी सेविकांकडून आपल्या अर्जाची आणि लाभाच्या स्थितीची माहिती घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.