RBI New ATM Rules: RBI कडून ATM आणि कार्ड पेमेंटच्या नियमात बदल; नवा चार्ज किती आणि तुमच्यावर काय परिणाम?

ATM Charges : RBI ने ATM आणि PoS मधून पैसे काढण्याचे नियम स्पष्ट केले आहेत. मोफत व्यवहारांची मर्यादा, २३ रुपयांची फी, फेल व्यवहार आणि UPI बद्दल जाणून घ्या महत्त्वाचे नियम.
RBI New ATM Rules 2026
RBI New ATM Rules 2026meta ai
Published On: 

सध्या संपूर्ण जग डिजिटल माध्यमाचा वापर करत आहे. कॅशलेस व्यवहारही मोठ्या प्रमाणात होतायेत. पण काही महत्त्वाच्या कामासाठी आपल्याला कॅश लागतेच. आता आधीसारखं बँकेत लांबच्या लांब रांगा लावून कोणीच पैसे काढत नाही. थेट ATM मध्ये जाऊन पैसे काढतात. पण ATM मधून पैसे काढण्याचे काही महत्त्वाचे नियम तुम्ही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अन्यथा तुमच्या खात्यातून पैसे जातील आणि त्याचं कारण तुम्हाला कळणारच नाही.

आता भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ATM आणि दुकानदारांच्या PoS मशीनमधून पैसे काढण्यासंबंधीचे नियम एका ठिकाणी आणलेत. २७ नोव्हेंबर रोजी RBI ने नवीन मास्टर डायरेक्शन जारी केले आहे. यामध्ये फ्री ट्रान्झॅक्शन, जास्तीची फी, फेल झालेल्या व्यवहारांचे नियम आणि UPI ने पैसे काढण्याबद्दल महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्यात. ग्राहकांसाठी सध्या लागू असलेल्या मोफत व्यवहारांच्या मर्यादेत कोणताही बदल केलेला नाही.

RBI New ATM Rules 2026
पांढरं आणि निळ्या आधार कार्डात काय फरक? जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

महिन्याला किती ATM व्यवहार मोफत?

RBI च्या नवीन निर्देशांनुसार, स्वतःच्या बँकेच्या ATM मधून ग्राहकांना दर महिन्याला ५ फ्री व्यवहार करता येतील. यात पैसे काढणं आणि बॅलन्स तपासण्यासारख्या व्यवहारांचाही समावेश आहे. दुसऱ्या बँकेच्या ATM मधून पैसे काढताना मेट्रो शहरांमध्ये ३ आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये ५ मोफत व्यवहारांची मर्यादा आहे. दोन्ही प्रकारच्या शहरांमध्ये दुसऱ्या बँकेचं ATM वापरल्यावर एकूण मर्यादा ५ व्यवहारांचीच असेल.

RBI New ATM Rules 2026
Gold Price Today : ३ दिवसात सोनं ४००० रुपयांनी महागलं, सुवर्णबाजारात दर वाढ का झाली?

फ्री व्यवहार संपल्यास किती शुल्क?

मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक जास्तीच्या व्यवहारासाठी बँक जास्तीत जास्त २३ रुपये आणि लागू कर आकारू शकते. ग्राहकांनी किती मोफत व्यवहार वापरलेत आणि पुढच्या व्यवहारासाठी किती शुल्क लागेल,याची माहिती देण्याचे निर्देश RBI ने बँकांना दिलेत.

दुसऱ्या बँकेच्या ATM मधून १० हजारांची मर्यादा

दुसऱ्या बँकेच्या ATM मधून एका व्यवहारात जास्तीत जास्त १० हजार रुपये काढता येतील. ही मर्यादा प्रत्येक व्यवहारासाठी आहे, संपूर्ण महिन्यासाठी नाही. ATM मध्ये तांत्रिक बिघाड, नेटवर्क समस्या किंवा पैसे मिळत नसल्यामुळे व्यवहार अयशस्वी झाल्यावर तो मोफत व्यवहारांच्या संख्येत मोजला जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही.

दुकानातील PoS मशीनमधूनही काढता येणार पैसे

ग्राहकांना दुकानातल्या PoS मशीनच्या मदतीनेही रोख रक्कम काढता येते. त्यासाठी काही मर्यादा असतात.

एका व्यवहारात जास्तीत जास्त २,००० रुपये

महिन्याला जास्तीत जास्त १०,००० रुपये

ग्राहक शुल्क जास्तीत जास्त व्यवहाराच्या रकमेच्या १ टक्के

तसेच या व्यवहारासाठी दुकानातून कोणतीही वस्तू खरेदी करणं बंधनकारक नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.