Strong Bones for Women saam tv
लाईफस्टाईल

Strong Bones: वयाच्या ३५ शी नंतर महिलांची हाडं का कमकुवत होतात? 'ही' आहेत कारणं

Strong Bones for Women: महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. विशेषतः वयाच्या ३५ नंतर महिलांमध्ये हाडांच्या समस्या वाढू लागतात आणि त्यांची हाडे कमकुवत (Weak Bones) होऊ लागतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • ३५ नंतर महिलांची हाडे कमजोर होणे सामान्य आहे.

  • एस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे हाडांची ताकद कमी होते.

  • कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हाडांसाठी आवश्यक आहे.

वयाच्या ३५ शी नंतर महिलांची हाडं हळूहळू कमजोर होऊ लागतात. ही गोष्ट ऐकायला साधी वाटली तरी तज्ज्ञांच्या मते हा नैसर्गिक बदल आहे. वय वाढत गेल्यावर शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि जीवनशैलीतील काही सवयी थेट हाडांच्या मजबुतीवर परिणाम करतात. जर वेळेत काळजी घेतली नाही, तर पुढे गंभीर त्रास उद्भवू शकतो.

अनेक महिला या समस्येकडे दुर्लक्ष करतात, पण ते टाळलं पाहिजे. तरुण वयातच हाडं मजबूत करणं गरजेचं आहे. अन्यथा पुढील काळात जास्त अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.

हाडं कमजोर होण्यामागची कारणं

महिलांमध्ये ‘एस्ट्रोजन’ नावाच्या हार्मोनाची कमतरता ही प्रमुख कारणं मानली जाते. हे हार्मोन हाडं मजबूत ठेवण्यासाठी मदत करतं. पण ३५ वर्षांनंतर शरीरातील एस्ट्रोजनचं प्रमाण कमी होऊ लागतं. त्यामुळे कॅल्शियम कमी होऊन हाडांची ताकद घटते आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.

कॅल्शियम आणि जीवनसत्त्व ‘डी’ आवश्यक

हाडं टिकवून ठेवण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ‘डी’ फार महत्वाचं आहे. यासाठी दूध, दही, पनीर, हिरव्या भाज्या यांचा आहारात समावेश करणं आवश्यक आहे. रोज किमान दहा मिनिटं उन्हात फिरणं. तसंच ‘फॉर्टिफाइड’ अन्नपदार्थ खाणं हे सुद्धा उपयुक्त ठरतं. या छोट्या सवयींमुळे हाडं मजबूत राहतात आणि ‘बोन डेन्सिटी’ चांगली टिकते.

हाडांच्या ताकदीचं खरं रहस्य

फक्त खाण्यापिण्यानेच हाडं मजबूत होत नाहीत. हलक्या-फुलक्या वजनाच्या व्यायामपद्धती जसं की brisk walking, योगाभ्यास किंवा resistance training हाडांना ताकद देतात. यामुळे स्नायूंमध्येही शक्ती वाढते आणि पडल्यामुळे होणाऱ्या फ्रॅक्चरचा धोका कमी होतो.

काही सवयी बदलाव्या लागतील

हाडं मजबूत ठेवण्यासाठी काही जीवनशैलीतील बदल करणंही महत्वाचं आहे. धूम्रपान आणि मद्यपान टाळणं गरजेचं आहे. संतुलित आणि पोषक आहार घेणं आवश्यक आहे. नियमित आरोग्य तपासण्या करून घेतल्यास हाडं कमजोर होण्याची प्रक्रिया वेळेत लक्षात येऊ शकते. अशा छोट्या-छोट्या सवयी भविष्यात मोठं संरक्षण देतात.

३५ वर्षांनंतर हाडं कमजोर होणं ही एक सामान्य समस्या आहे. मात्र योग्य आहार, रोजचा व्यायाम आणि जीवनशैलीतले काही छोटे बदल यामुळे महिलांची हाडं दीर्घकाळ मजबूत राहू शकतात. डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे, जर वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून याकडे लक्ष दिलं, तर पुढच्या आयुष्यात मोठे त्रास टाळता येऊ शकतात.

३५ वर्षांनंतर महिलांची हाडे का कमजोर होतात?

एस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यामुळे हाडे कमजोर होतात.

हाडांच्या आरोग्यासाठी कोणते पोषक घटक आवश्यक आहेत?

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हाडांसाठी आवश्यक आहेत.

व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी काय करावे?

दररोज किमान १० मिनिटे उन्हात फिरावे.

हाडांची ताकद वाढवण्यासाठी कोणते व्यायाम फायदेशीर आहेत?

ब्रिस्क वॉकिंग, योग आणि रेझिस्टन्स ट्रेनिंग फायदेशीर आहेत.

हाडे मजबूत ठेवण्यासाठी कोणत्या सवयी टाळाव्यात?

धूम्रपान आणि मद्यपान टाळावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Screen time kids: वाढता स्क्रीन टाइम मुलांसाठी धोकादायक ठरतोय का? डॉक्टरांनी सांगितले गंभीर परिणाम

सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार जवळपास निश्चित; हा बडा नेता देणार टक्कर?|VIDEO

Crime : शिक्षकी पेशाला काळिमा! गुप्तांगाला हात लावला अन्...; दहावीच्या विद्यार्थावर लैंगिक अत्याचार

Maharashtra Live News Update: कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर भरधाव कारची चार दुचाकींना धडक

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8वा वेतन आयोगाचा निर्णय शेवटच्या टप्प्यात; लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT