Early signs heart attack face: हार्ट अटॅक येण्यापूर्वी चेहऱ्यामध्ये दिसतात ३ मोठे बदल; लक्षणं दिसताच डॉक्टरांची मदत घ्या
चुकीचा आहार आणि अयोग्य लाईफस्टाईल यांच्यामुळे अनेकांना हृदयासंबंधीच्या समस्यांचा त्रास होतो. यामध्ये हॉर्ट अटॅकचा देखील समावेश आहे. गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसतेय.
गेल्या काही वर्षांपूर्वी वृद्धांमध्ये हृदयविकाराची प्रकरणं दिसून येत होती. मात्र आजच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रकरणे झपाट्याने वाढतायत. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं ओळखून त्यावर वेळीच उपचार करणं शक्य आहे. यामुळे रूग्णाचा जीव वाचण्यास मदत होते. ही लक्षणं काय आहेत ती जाणून घेऊया.
चेहऱ्यावर सूज येणं
कोणत्याही कारणाशिवाय चेहऱ्यावर सूज येणं हे हृदयविकाराचं लक्षण असू शकतं. हृदयात काही समस्या असल्यास शरीरात रक्त योग्यरित्या पंप केलं जाऊ शकत नाही. ज्यामुळे शरीरात द्रव जमा होऊ लागतं. ज्यामुळे चेहऱ्यावर सूज येऊ शकते.
डोळ्यांच्या खाली पिवळे डाग येणं
जर तुम्हाला डोळ्यांखाली किंवा पापण्यांभोवती लहान पिवळे डाग दिसत असतील तर सावध व्हा. याशिवाय डोळ्यांच्या खाली गाठी दिसल्या तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. डोळ्यांभोवती पिवळे डाग वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.
चेहऱ्याच्या डाव्या बाजूला वेदना
चेहऱ्याच्या डाव्या बाजूला वेदना किंवा सुन्नपणा हा हृदयविकाराचा झटका येण्याचं लक्षण असू शकतं. हात आणि पाय सुन्न होणं हे रक्तवाहिन्यांमधील अडथळ्याचं लक्षण मानलं जातं. रक्तवाहिन्यांमधील अडथळे हे हृदयाशी संबंधित समस्येचं एक प्रमुख लक्षण आहे.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.