Surabhi Jayashree Jagdish
किडनी शरीरातील युरिया, क्रिएटिनिनसारखे पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करतं. यामुळे रक्तामध्ये पाणी, मीठ आणि खनिजांचे संतुलन टिकून राहतं.
दैनंदिन आयुष्यातील काही सवयी आपल्या किडनीसाठी हानिकारक ठरतात आणि अनेकदा याची जाणीवसुद्धा होत नाही. या छोट्या-छोट्या सवयींमध्ये सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे.
जास्त मीठ खाल्ल्यामुळे किडनीवर ताण येतो आणि त्यासोबतच इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. केवळ जेवणातले मीठ नव्हे तर चिप्स, नमकीनसारखे स्नॅक्सदेखील मीठ जास्त असलेले असतात.
किडनीची सफाई करण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.
पाण्याची कमतरता असल्यास किडनीला शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी जास्त ताण सहन करावा लागतो.
जर तुम्हीही अशा लोकांपैकी असाल जे प्रत्येक छोट्या वेदनेवर पेनकिलर घेतात तर ही सवय तुमच्या किडनीसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा औषधांचा अनावश्यक वापर टाळावा.
धूम्रपान किंवा मद्यपान करणं केवळ किडनीसाठीच नाही तर शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही घातक ठरतं.
कामाच्या व्यापामुळे जर तुम्ही बरेच तास बसून राहता आणि त्यामुळे लघवी रोखून ठेवता, तर ही सवय किडनीला मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहोचवते.