Heart Attack Signs: धोक्याची घंटा! झोपेतून उठल्यानंतर घाम येतोय? येऊ शकतो हार्ट अटॅक, ही 6 लक्षणे दिसल्यास वेळीच घ्या काळजी

Sweating On Waking Up : अनेकदा असे म्हटले जाते की, सकाळच्या वेळी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही जास्त असतो.
Heart Attack Signs
Heart Attack SignsSaam tv

Heart Attack Symptoms : सकाळची वेळ ही योग, व्यायाम यासाठी अधिक महत्त्वाची समजली जाते. सकाळी लवकर उठल्याने आपल्या वातावरणातील ताजी हवा मिळते. त्यामुळे दिवसभर उत्साही व आनंदी राहाता येते. म्हणून सकाळी लवकर उठण्याची सवय लावली पाहिजे.

अनेकदा असे म्हटले जाते की, सकाळच्या वेळी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही जास्त असतो. हृदयविकाराच्या झटक्याची बहुतेक लक्षणे झोपेतून उठल्यानंतर लगेच दिसून येतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन (संदर्भ) च्या संशोधनातून असे दिसून आले आहे की सकाळी 6 ते दुपारपर्यंत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 40 टक्के जास्त असतो. कारण झोपेत रक्त अधिक घट्ट होते. झोपेतून उठल्यानंतर दिसणारी हृदयविकाराची सुरुवातीची ५ लक्षणे चुकूनही दुर्लक्षित करू नयेत.

Heart Attack Signs
Diabetes Sign : शरीरातील काही बदल वेळेत ओळखा, दुर्लक्ष केल्यास Blood Sugar क्षणात वाढेल

1. घाम येणे

झोपेतून उठल्यानंतर शरीर घामाघूम होत असेल तर आपल्याला हृदयाची काळजी (Heart Care) अधिक घ्यावी लागेल. जेव्हा रक्ताच्या गुठळ्यामुळे रक्तवाहिनी अवरोधित होते, तेव्हा हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. ज्यामुळे झोपे आपल्याला घाम येऊ शकतो

2. डाव्या बाजूला वेदना

डाव्या जबड्यापासून डाव्या हातापर्यंत हृदयविकाराच्या मुख्य लक्षणांपैकी एक आहे. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर डाव्या बाजूला दुखत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Heart Attack Signs
Side Effects Of Sitting Wrong positions : ऑफिसमध्ये एकाच जागी बसून काम करण्याची सवय आहे? शरीराच्या या भागांवर होऊ शकतो परिणाम

3. झोपेत गुदमरणे

हृदयविकाराच्या झटक्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि गुदमरल्यासारखे वाटू शकते. यामुळे आपण अचानक खडबडून जागा होतो. सकाळी उठल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या लक्षणाकडे (Symptoms) अजिबात दुर्लक्ष करू नका.

4. छातीत जडपणा

हृदयविकाराच्या झटक्याने छातीत दुखते, जे पाठीपर्यंत जाणवते. या दरम्यान, छातीवर जडपणा किंवा घट्टपणा जाणवू शकतो. ही चिन्ह आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Heart Attack Signs
Good Habits In Children : मुलांना लहानपणापासूनच या ९ चांगल्या सवयी लावा, लोक म्हणतील वाह!

5. मळमळ उलट्या

मॉर्निंग (Morning) सिकनेसमध्ये असा त्रास होणे सामान्य आहे. पण त्यामागे सायलेंट हृदयविकाराचा झटकाही असू शकतो. हृदयाच्या रक्तवाहिनीत अडथळा आल्यावर रुग्णाला उलट्या किंवा मळमळ झाल्यासारखे वाटते.

Heart Attack Signs
Bad Cholesterol Drink : रोज प्या हे ड्रिंक, कोलेस्ट्रॉल होईल मिनिटात छुमंतर

6. नसा कशा मोकळ्या कराल?

धान्य, शेंगा, भाज्या, ताजी फळे, नट आणि बिया यांचे सेवन करा आणि जास्त चरबीयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा. यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च ट्रायग्लिसराइड कमी होईल आणि हृदयाच्या नसा मोकळ्या होतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com